पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्व सार्वजनिक बँका सकाळी ९ वाजता उघडणार

सर्व सार्वजनिक बँका सकाळी ९ वाजता उघडणार

अनेक लोक बँकांशी निगडीत कामासाठी बँक सुरु होण्याची वाट पाहत असतात. बहुतांश सार्वजनिक बँका या सकाळी १० वाजता सुरु होतात आणि ग्राहकाला तोपर्यंत वाट पाहावी लागते. पण आता बँकां आपल्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. आपल्या कार्यालयाला जाण्यापूर्वी ग्राहकांना बँकेची कामे संपवता येतील. हे नवे नियम सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. जर हे नियम लागू झाले तर बँका सकाळी ९ वाजता सुरु होतील. 

जिओ फायबरची घोषणा; मोफत टीव्ही, १०० MBPS स्पीड

सकाळी ९ वाजता उघडणार बँक

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने सर्व सरकारी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना सकाळी ९ वाजता बँक सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार देशभरातील बँका सुरु करण्याची वेळ एक सारखी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 

सुविधांनुसार बँका सुरु झाल्या पाहिजेत

जून महिन्यात बँकिंग विभागाची एक बैठक झाली होती. त्यामध्ये सुविधांनुसार बँकेच्या शाखा उघडण्यावर भर देण्यात आला. ग्राहक सुविधांवर गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत भारतीय बँकिंग असोसिएशनने बँका उघडण्याच्या वेळेबाबत ३ प्रस्ताव दिले होते. पहिला प्रस्ताव हा सकाळी ९ ते दुपारी ३, दुसरा सकाळी १० ते दुपारी ४ आणि तिसरा प्रस्ताव हा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा आहे. बँका आपल्या वेळेबाबत राज्यस्तरावर बँकर्स समितीबरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ शकतात. 

स्पाईसजेटने कमाविला रेकॉर्डब्रेक नफा!

सप्टेंबरपासून बँका नवीन वेळेनुसार उघडणार

बँका सुरु होण्याची नवी वेळ ही सप्टेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.