पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशमध्येही कांद्याचे वांदे, प्रति किलो २२० रुपयांचा दर

बांगलादेशमध्येही कांद्याचे वांदे, प्रति किलो २२० रुपयांचा दर

बांगलादेशमध्ये कांद्याच्या दराने विक्रमी उंची गाठल्यानंतर सरकारने त्वरीत हवाई मार्गाने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आपल्या भोजनाच्या यादीतून कांदा हटवला आहे.

भारतातून निर्यात रोखल्यानंतर या शेजारी देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. भारतात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. दक्षिण आशियाई देशात जेवणात कांद्याचे मोठे महत्त्व आहे. राजकीय दृष्ट्याही हे खूप संवेदनशील खाद्य उत्पादन आहे.

जीएसटी रिटर्न न भरल्यास कडक कारवाई

साधारणपणे बांगलादेशमध्ये एक किलो कांद्याचे दर ३० टका (सुमारे २५ रुपये किलो) असतो. पण भारतातून निर्यात बंद झाल्यामुळे त्याची उपलब्धता कमी झाल्याने कांद्याचे दर वेगाने वाढून २६० टका (सुमारे २२० रुपये किलो) पर्यंत पोहोचले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या उप-प्रसिद्धी सचिव हसत जाहिद तुषार यांनी हवाई मार्गाने कांदा मागवल्याचे 'एएफपी'ला सांगितले.

'एक देश, एकाच दिवशी वेतन' व्यवस्था लवकरच देशात लागू

दुसरीकडे पंतप्रधानांनी आपल्या भोजनातून कांदा वापरणे बंद केल्याचे सांगितले. ढाका येथील पंपंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या पदार्थातून कांद्याचा वापर केला बंद करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, कांद्याच्या अनेक खेपा या चितगाव शहरातील बंदरावर रविवारी पोहोचल्या आहेत. जनतेचा रोष पाहता म्यानमार, तुर्की, चीन आणि इजिप्तमधून कांदा आयात केला गेला आहे. बांगलादेशचा सार्वजनिक उपक्रम बांगलादेश व्यापार निगमनेही ४५ टका प्रति किलो कांदा राजधानीत विकण्यास प्रारंभ केला आहे.

ऐतिहासिक तोट्यानंतर व्होडाफोन-आयडियाची सरकारकडे मदतीची याचना