पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बजाजची इलेक्ट्रिक चेतक : रिव्हर्स गिअर, घरातच चार्ज करता येणार आणि बरंच काही...

बजाजची इलेक्ट्रिक चेतक स्कूटर

गेल्या काही महिन्यांपासून ज्याची प्रतिक्षा होती ती बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर मंगळवारी लाँच करण्यात आली. या गाडीच्या सुरुवातीच्या श्रेणीची किंमत एक लाख रुपये आहे. जुन्या काळात बजाजच्या चेतक गाडीने भारतीय दुचाकी क्षेत्रात अधिराज्य केले होते. त्यावेळी अनेकांकडे ही गाडी होती. विशेषतः सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात गाडीचे स्वप्न चेतकने पूर्ण केले होते. आता हीच गाडी इलेक्ट्रिक स्वरुपात येत असल्यामुळे त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

TikTok साठी शुटिंग सुरू होते, गोळी उडाली आणि त्याचा जीव गेला...

इलेक्ट्रिक चेतकच्या पुढे ड्रम ब्रेक असलेल्या गाडीची एक्स शोरूम किंमत एक लाख रुपये आहे. तर गाडीच्या पुढील चाकाचा डिस्क ब्रेक असेल तर त्याची किंमत १.१५ लाख रुपये आहे. संपूर्णपणे मेटलची बॉडी असलेल्या या गाडीचा लूक एकदम हटके ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाडीला रिव्हर्स गिअर असणार आहे. 

गाडीची वैशिष्ट्ये...

हॉर्स शू एलईडी हेडलाईट्स

सॉफ्ट इलेक्ट्रिक बटणे

चावीविना गाडी सुरू करता येणार

एकदा चार्ज केली की इको मोडमध्ये ९५ किलोमीटर धावू शकणार

स्पोर्टस मोडमध्ये एकदा चार्ज केली की ८५ किलोमीटर धावू शकणार

बॅटरीची ७०००० किलोमीटरपर्यंत पूर्ण क्षमतेने काम करण्याची ताकद

पाच तासांमध्ये बॅटरी १०० टक्के चार्ज होऊ शकते

बॅटरी २५ टक्के चार्ज होण्यासाठी एक तास लागतो.

स्कूटरमध्ये आता रिव्हर्स गिअर

आपल्याकडील मोबाईलला कनेक्ट करता येणार. जेणेकरून मोबाईलवर गाडीची बॅटरीचे चार्जिंग किती शिल्लक आहे समजू शकणार.

स्कूटरसोबत कॉम्प्लिमेंटरी चार्जरही मिळणार. ग्राहकाच्या घराजवळ हे चार्जर बसवता येणार.