पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का ?

चेतक स्कूटर

बजाजच्या वाहनांनी ८० च्या दशकात संपूर्ण देशाला भुरळ घातली होती. स्कूटरमध्ये बजाजच्या मॉडेल्सला सर्वांधिक मागणी होती. परंतु, कालौघात स्कूटरची मागणी कमी झाली आणि बाईकला मागणी वाढू लागली. बजाजने काळाची पावले ओळखत बाईक सेगमेंटमध्येही आघाडी घेतली. त्यांचे अनेक मॉडेल्स तरुणाईच्या आवडीच्या आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून स्कूटर्सकडे भारतीयांची ओढ वाढल्याचे दिसते. त्याचाच फायदा घेण्यासाठी एकेकाळी भरपूर मागणी असलेली 'चेतक' ही स्कूटर पुन्हा नव्याने सादर केली आहे. 

५ वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था 'नामुमकीन'

बजाजने आपली लोकप्रिय स्कूटर ब्रँड चेतकचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहे. बॅटरीवर असलेल्या चेतकची विक्री जानेवारीपासून पुण्यातून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती बेंगळुरु आणि देशातील इतर बाजारपेठेत नेण्यात येणार आहे. ही स्कूटर चाकण येथील कंपनीत तयार केली जाणार असून कंपनीच्या प्रो-बायकिंग डिलर्सच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाणार आहे. कंपनी पुढच्या वर्षीपर्यंत ही स्कूटर यूरोपीय बाजारात नेण्याची योजना करत आहे. 

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

भारतीय बाजारात सुमारे १४ वर्षांनंतर बजाज चेतकचे इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पुनरागमन झाले आहे. रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अमिताभ कांत तचेच बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या उपस्थितीत या स्कूटरचे सादरीकरण करण्यात आले.

कंपनीने आपल्या ई स्कूटरच्या किमतीबाबत माहिती दिलेली नाही. पण याची किंमत साधारणतः दीड लाखांपेक्षा अधिक नसेल, असे सांगण्यात येते.

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटेची छपाई केली बंद