पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्थिती चिंताजनक, विक्रीत १९९८ नंतरची मोठी घसरण

गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठी घट

देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील भीतीदायक चित्र सलग दहाव्या महिन्यात कायम असून, विक्रीचे सातत्याने ढासळणारे आकडे या क्षेत्रातील अनेकांची काळजी वाढविणारे आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडून सोमवारी ताजी माहिती जाहीर करण्यात आली. यामध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१.५७ टक्क्यांची घट झाली आहे. तर प्रवासी कारच्या विक्रीमध्ये ४१.०९ टक्क्यांची घट झाली आहे. 

प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याची वेळ आली: नरेंद्र मोदी

१९९७-९८ पासून या स्वरुपाची माहिती जमविण्यास सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच विक्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. ट्रक आणि बसच्या विक्रीमध्ये ३९ टक्क्यांनी तर दुचाकी गाड्यांच्या विक्रीमध्ये २२ टक्क्यांनी घट झाली आहे. 

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गेल्या आठवड्यात कंपनीने गुरुग्राम आणि मानेसर येथील कारचे उत्पादन दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. कंपनीने पहिल्यांदाच अशा पद्धतीने कारचे उत्पादन बंद ठेवले आहे.

भाषणाचे फड गाजवणाऱ्या दिलीप सोपलांचे विधानसभेत मौन

गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एप्रिलपासून साडेतीन लाख कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्यांवर बंदी घालण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.