पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

HTLS 2019 : अर्थव्यवस्थेत सुधारणेला आणखी १८ ते २० महिने लागतील - कुमार मंगलम बिर्ला

कुमार मंगलम बिर्ला

वस्तू व सेवा कराचा टप्पा आणखी कमी करणे आणि कॉर्पोरेट जगतासाठी आर्थिक पॅकेज देणे, या दोन्ही गोष्टी सरकारने केल्या तर त्याचा सध्याच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यास नक्कीच उपयोग होईल, असे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समिट २०१९ मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर सडेतोडपणे आपली मते मांडली.

फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली

ते म्हणाले, केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत हे नाकारता येणार नाही. पण आम्हाला सध्या आर्थिक पॅकेजची विशेष गरज आहे. जर वस्तू व सेव कराचा टप्पा १५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला तर त्याचा आम्हाला खूप उपयोग होईल. कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. यामुळे आम्हाला नक्कीच मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर सध्या खाली घसरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये विकासदर ४.५ टक्के इतका राहिला होता. या मुद्द्यावर बोलताना कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा सुधारणा होण्यासाठी आणखी १८ ते २० महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल. 

HTLS 2019 : पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर आमचा भर - नरेंद्र मोदी

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशीपमध्ये (आरसेप) सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय योग्यच होता, असे त्यांनी सांगितले. या करारात अनेक भारतविरोधी तरतुदी होत्या. त्या आपण का स्वीकारायच्या असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.