पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर खोऱ्यातील पर्यटन क्षेत्रात चिंतेचे सावट

जम्मू-काश्मीर पर्यटन क्षेत्रात चिंतेचे वातावरण

काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त असताना देखील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात टॅक्सी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ईदच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या भागात आणि परदेशात असलेले काश्मीरमधील नागरिक घरी परतत असल्याने टॅक्सी व्यवसाय जोरात सुरु आहे. मात्र राज्यातील सर्व स्तरीय व्यवसायाला गती मिळण्यासाठी काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरण लवकरात लवकर सुधारण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या व्यावसायिकांमधून उमटत आहेत.

Article 370: मोदी-शहा जोडी कृष्ण अन् अर्जुनासारखी- रजनीकांत 

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आहे. जम्मू काश्मीरला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. काश्मीरला सर्वाधिक उत्पनाचे साधन असणाऱ्या पर्यटनाचा यात समावेश असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

Article 370: राज्यसभेत विधेयक सादर करण्यापूर्वी मनात भीती होती - शहा

श्रीनगर विमानतळ परिसरातील टॅक्सी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ लोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन कालावधी आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना भविष्याची चिंता सतावत आहे. काश्मीर खोऱ्यातील सध्य परिस्थिती पाहता मार्च २०२० पर्यंत राज्यात पर्यटन वाढीची आस धूसर दिसत आहे. याचा फटका अनेक व्यावसायिकांना बसू शकतो.