पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठरले! अ‍ॅपलच्या रिटेल स्टोअरची ठिकाणे निश्चित

अ‍ॅपल स्मार्टफोन रिटेल स्टोअर

स्मार्टफोन्सच्या बाजारात स्वतःची वेगळी ओळख आणि ग्राहकवर्ग निर्माण केलेल्या अ‍ॅपलकडून लवकरच भारतात स्वतःची रिटेल स्टोअर (दुकान) सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी महत्त्वाची ठिकाणे ठरविण्यात आली असून, त्याची छोटी यादी जवळपास निश्चित झाली आहे. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांकडून याबद्दल माहिती मिळाली. भारतात स्मार्टफोनची मागणी वेगाने वाढते आहे. त्यामुळे अ‍ॅपलने आता भारताकडे अधिक लक्ष देण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी अ‍ॅपलने स्वतःची रिटेल स्टोअर सुरू करण्याचे निश्चित केले आहे. लाईव्ह मिंटने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

अ‍ॅपलने मुंबईतील ठिकाणे निश्चित केली असून, या संदर्भातील अंतिम निर्णय येत्या काही दिवसांतच घेतला जाणार आहे. मुंबईतील निश्चित करण्यात आलेली ठिकाणे ही न्यूयॉर्कमधील अ‍ॅपलचे रिटेल स्टोअर, लंडनमधील रिजेंट स्ट्रीटवरील रिटेल स्टोअरला साजेशीच असणार आहेत. परदेशातील कंपनीला भारतात रिटेल स्टोअर सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे अ‍ॅपलने आतापर्यंत भारतात स्टोअर सुरू केले नव्हते. पण आता अ‍ॅपलच्या उत्पादनांची निर्मिती भारतात सुरू झालेली आहे. त्यामुळे कंपनी केंद्र सरकारशी रिटेल स्टोअर सुरू करण्यासंदर्भात चर्चा करते आहे. 

या दिवशी 'वनप्लस ७' होणार लाँच

अ‍ॅपलने सुरुवातीपासून भारतातील मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील वर्गाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा ग्राहक चीनमध्ये निर्माण करण्यात आलेल्या स्वस्तातील स्मार्टफोनकडे वळाला. पण आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष देण्याचे कंपनीने ठरविले असल्याचे अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी सांगितले. भारतात अ‍ॅपलच्या स्मार्टफोन्सची निर्मिती सुरू झाल्यामुळे आयात केलेल्या स्मार्टफोनपेक्षा येथे तयार करण्यात आलेले स्मार्टफोनचे दर २० टक्क्यांनी कमी ठेवता येतील, असेही कंपनीने म्हटले आहे. दीर्घकालीन विचार करता भारतीय बाजार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे टीम कूक यांनी गेल्याच आठवड्यात म्हटले होते.

या सोप्या टीप्सनं ठेवा तुमचा पासवर्ड सुरक्षित

दरम्यान, नुकत्याच संपलेल्या तिमाहीतील निकालांनुसार अ‍ॅपलने त्यांचा ४४ टक्के महसूल हा एकट्या अमेरिकेतून कमावला आहे. तर १८ टक्के चीनमधून मिळवला आहे. भारताचा समावेश असलेल्या आशिया-पॅसिफिकमधून कंपनीने अवघा ६ टक्के महसूल मिळवला आहे.