पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरेरे! ऍपलचे प्रमुख टीम कूक यांचे वेतन घटले

टीम कुक

ऍपलच्या विविध उत्पादनांच्या विक्रीमध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये घट झाल्याने कंपनीचे प्रमुख टीम कुक यांच्या वेतनातही घट झाली. २०१९ टीम कूक यांना वार्षिक एक कोटी १६ लाख डॉलर एवढेच वेतन मिळाले. २०१८ मध्ये त्यांना वार्षिक एक कोटी ५७ लाख डॉलर एवढे उत्पन्न मिळाले होते. टीम कुक यांना ३० लाख डॉलर इतके मूळ वेतन दिले जाते. त्यावर इतर भत्ते आणि बोनस यांचा समावेश असतो. कंपनीच्या परफॉर्मन्सवर इतर भत्ते आणि बोनस अवलंबून असतो.

खातेवाटपाला विलंब का होतंय मुख्यमंत्रीच सांगतील - संजय राऊत

ऍपलच्या विविध उत्पादनांची विक्री त्या वर्षात कशी झाली, यावर कंपनीकडून दिले जाणारे विविध भत्ते आणि बोनस अवलंबून असतात. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये कंपनीच्या उत्पादनांची विक्री अपेक्षित न झाल्याने त्यांच्या एकूण वेतनात कपात झाली आहे. २०१९ मध्ये टीम कुक यांना ७७ लाख डॉलर इतक्या रकमेचे भत्ते आणि बोनस देण्यात आले. २०१८ मध्ये टीम कुक यांना एक कोटी २० लाख डॉलर इतक्या रकमेचे भत्ते आणि बोनस मिळाले होते. त्यामुळेच २०१९ मध्ये त्यांच्या एकूण वेतनात इतका मोठा फरक पडला आहे. 

टीम कुक यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या खासगी विमानावर २०१९ मध्ये कंपनीकडून ८८५००० डॉलर खर्च करण्यात आले आहेत. टीम कुक यांच्या खासगी आणि कंपनीशीसंबंधित सर्व प्रकारच्या  प्रवासासाठी त्यांना खासगी विमान दिले जाते. 

अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

ऍपल आयफोनच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षात घट झाल्याने आता कंपनी इतर माध्यमातून आपला महसूल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. डिजिटल मजकूर इतर सेवांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जातो आहे.