पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनिल अंबांनींची आणखी एक कंपनी दिवाळखोरीत

अनिल अंबानी (PTI file photo)

अनिल अंबानी यांच्या मालकीची आणखी एक कंपनी दिवाळखोरीत जात आहे. कर्जात बुडालेली टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनची सहयोगी कंपनी जीसीएक्स लिमिटेडने दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

Amazon च्या नव्या ऑफिसात ४९ लिफ्ट्स, झुम्बा क्लासेस; तरीही...

जीसीएक्सजवळ समुद्राखालील जगातील सर्वांत मोठी खासगी केबल यंत्रणा आहे. ३५ कोटी डॉलरची थकबाकी देण्यात अपयशी ठरल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशनही दिवाळखोरीच्या संकटात आली होती. रिलायन्स समूहाने रोड ते रेडिओ स्टेशन्स विकून २१,७०० कोटी रुपये मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते. नुकताच समूहाची आणखी एक कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडने अपुऱ्या रोकडचा सामना करत असल्याचे म्हटले होते.

 

Reliance Jio Giga Fiber:जाणून घ्या टीव्ही, प्लॅन आणि ऑफरची माहिती