पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनिल अंबानी म्हणाले मी कंगाल झालोय, कोर्टाने म्हटलं तरीही पैसे जमा करा

अनिल अंबानी

एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे दिवाळखोर झाल्याचा युक्तिवाद फेटाळत ब्रिटनच्या एका न्यायालयाने त्यांना १०० मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ७१५ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याचे संकेत रिलायन्स समूहाने दिले आहेत. चीनच्या तीन बँकांनी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) विरोधात अनिल अंबानी यांच्या वैयक्तिक गॅरंटीवर वर्ष २०१२ मध्ये ९२५ मिलियन डॉलर म्हणजेच ६४७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ते अंबानी यांनी परत केले नाहीत. 

सरकारी बँकांची वेळ बदलली, जाणून घ्या किती वाजेपर्यंत भरु शकाल पैसे

अनिल अंबानी यांनी ठरलेल्या अटींनुसार थकीत ६८० मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ४६९० कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी या बँकांनी केली होती. परंतु, न्या. डेव्हिड वॉक्समन यांनी अंबानींना सहा आठवड्याच्या आत न्यायालयात १०० मिलियन डॉलर म्हणजेच ७१५ कोटी जमा करण्यास सांगितले. अनिल अंबानी यांची भारतातील निव्वळ संपत्ती शून्य झाली असून त्यांचे कुटुंबीयही मदत करण्यास पुढे येत नसल्याचा त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयांनी अमान्य केला.

हरीश साळवे हे अनिल अंबानी यांची बाजू मांडत आहेत. अनिल अंबांनी यांनी भारतात दिवाळखोरीसाठी अर्ज दिला आहे का, असा सवाल न्यायाधीशांनी साळवे यांना विचारला. यावर साळवेंनी नाही असे उत्तर दिले. 

स्टेट बँकेचे गृहकर्ज होणार आणखी स्वस्त

अंबानींच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान म्हटले की, अंबानी यांचा नेटवर्थ २०१२ पासून सातत्याने खाली येत आहे. भारत सरकारने स्पेक्ट्रम देण्याच्या धोरणात बदल केल्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात नाटकीय बदल झाले. वर्ष २०१२ मध्ये अंबानींची गुंतवणूक ७ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. आज ती ८.९ कोटी डॉलर इतकी राहिली आहे. जर यात कर्जांचा समावेश केला तर तो शून्यावर येईल.

दरम्यान, बँकेच्या वकिलांनी अंबानी यांच्या दिवाळखोरीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या विलासी जीवनशैलीचा उल्लेख केला. बँकेच्या वकिलांनी म्हटले की, अंबानींकडे ११ पेक्षा अधिक लक्जरी कार, एक खासगी जेट, एक याट आणि दक्षिण मुंबईमध्ये एक सी-वूड पेंटहाऊस आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अनेकवेळा संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याची उदाहरणे दिली.

एअरटेलकडून ग्राहकांना झटका, बंद केली ही सेवा

दरम्यान, या निर्णयाचा परिणाम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., रिलायन्स पॉवर लि. आणि रिलायन्स कॅपिटल लि. वर पडणार नसल्याचे अनिल अंबानी यांचे प्रवक्त्यांनी म्हटले.