पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओला, उबेरच्या नियमनासाठी गरज पडल्यास कायद्यात सुधारणा करा - सुप्रीम कोर्ट

ऍप आधारित टॅक्सी सेवा

ऍप आधारित टॅक्सीसेवा ओला आणि उबेर यांचे नियमन करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. गरज पडल्यास कायद्यामध्ये सुधारणा करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिले. 

करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; 10 ते 15 जण अडकले

ऍप आधारित टॅक्सी सेवेतील महिलांच्या सुरक्षिततेवरून सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. न्या. एस ए बोबडे, न्या. आर सुभाष रेड्डी आणि न्या. बी आर गवई यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली.

पुलवामा हल्ल्याच्या आणखी एका सूत्रधाराचा खात्मा

याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी आपली बाजू केंद्र सरकारपुढे मांडण्यासाठी प्रतिनिधी नेमावेत, अशीही सूचना न्यायालयाने केली. ऍप आधारित टॅक्सी सेवेच्या नियमनासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करावी लागेल, असे केंद्र सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर गरज पडल्यास सुधारणा करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.