पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऍमेझॉनकडून देशातील छोट्या उद्योगांसाठी मोठी घोषणा

जेफ बेझॉस

भारतातील लघू आणि मध्यम उद्योगांना डिजिटल व्यासपीठावर आणण्यासाठी ऍमेझॉनकडून तब्बल एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख जेफ बेझॉस यांनी सांगितले. नवी दिल्लीमध्ये कंपनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. २०२५ पर्यंत भारतीय बनावटीच्या १० अब्ज डॉलरच्या वस्तूंची ऍमेझॉनच्या माध्यमातून निर्यात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट

भारतामध्ये काहीतरी विशेष आहे. त्यातही हा मोठा लोकशाही देश आहे. या देशातील ऊर्जा आपल्याला कायमच खुणावते, असे सांगून जेफ बेझॉस म्हणाले की, येत्या काळात भारतात ऍमेझॉनला मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा आहे. त्यासाठीच कंपनीने ५.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. 

सिंचन घोटाळा : अजित पवार यांची आता हायकोर्टात धाव

दरम्यान, ऍमेझॉनकडून मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंवर सवलत दिली जात असल्याने छोट्या व्यावसायिकांवर बेकारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जेफ बेझॉस यांच्या या दौऱ्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.