पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनकडून भन्नाट ऑफर, नोकरी सांभाळून मिळवा वरकमाई!

अ‍ॅमेझॉन

कमीत कमी वेळेत ग्राहकांना त्यांची वस्तू नेऊन देणे हे 'ई कॉमर्स' क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सर्वात गरजेचे असते. हेच ओळखून अ‍ॅमेझॉनने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आता जास्त मागणीच्या वेळी लवकरात लवकर ग्राहकांना वस्तू नेऊन देण्यासाठी अ‍ॅमेझॉनने नवी योजना आणली आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुण, गृहिणी आणि निवृत्ती स्वीकारलेल्या व्यक्ती आपापल्या पद्धतीने अर्धवेळ काम करून पैसे कमावू शकणार आहेत. 

उदयनराजेंना आवरा, नाही तर पक्षातून बाहेर पडू, रामराजेंचा इशारा

ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या वस्तू लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्रयत्नशील आहे. यासाठी आतापर्यंत विविध योजना कंपनीने आणल्या आहेत. यामध्ये प्राईम ग्राहकांना एक दिवसात डिलिव्हरी देण्याचे अ‍ॅमेझॉनने निश्चित केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू सुद्धा केली. आता तर काही किराणा मालाच्या वस्तू अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना दोन तासांत त्यांच्या घरी पोहोचविल्या जातात. याचेच पुढचे पाऊल ठरणार आहे अ‍ॅमेझॉन फ्लेक्स.

अ‍ॅमेझॉन फ्लेक्समुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. अर्थात आपला चालू व्यवसाय किंवा नोकरी सांभाळूनही लोकांना हे काम करता येणार आहे. अ‍ॅमेझॉन फ्लेक्समध्ये कोणालाही चार तास काम करून प्रतितास १२० ते १४० रुपये कमाविता येतील. यामध्ये अ‍ॅमेझॉनकडील वस्तू संबंधित ग्राहकांच्या घरपोच करण्याचे काम संबंधिताला करावे लागेल. हे काम करणारे सर्वजण अ‍ॅमेझॉनचे पार्टटाइम डिलिव्हरी पार्टनर असतील. त्यांना दर आठवड्याच्या बुधवारी पगार दिला जाईल. 

'तुझ्यात जीव रंगला'मधील अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा

अधिकाधिक ग्राहकांनी अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करावी आणि त्यांना त्यांच्या वस्तू लवकरात लवकर पोहोचवता याव्यात यासाठी याचा फायदा होणार आहे, असे अ‍ॅमेझॉनचे एशियातील उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी म्हटले आहे. सुरुवातीला ही नवी संधी बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी अन्य शहरांमध्येही तिचा विस्तार केला जाईल.