पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये प्राईम मेंम्बरशीपसाठी धमाकेदार ऑफर

ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल

ऍमेझॉनकडून सध्या ग्रेट इंडियन सेल सुरू आहे. या सेलमध्ये ऍमेझॉनकडून विकल्या जाणाऱ्या विविध वस्तूंवर मोठी सवलत दिली जाते आहे. यामध्ये स्मार्टफोन्सवर ४० टक्के, ऍमेझॉनच्या विविध उपकरणांवर ४५ टक्के, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते आहे. या सर्वांसोबतच ऍमेझॉनच्या प्राईम सदस्यनोंदणीवरही सवलत देण्यात येते आहे.

नांदेडमध्ये चार शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

सध्या ऍमेझॉनकडून प्राईमसाठी दोन स्वरुपाची सदस्य नोंदणी केली जाते आहे. यामध्ये वार्षिक ९९९ रुपयांचा एक प्लॅन आहे. तर महिन्याला १२९ रुपयांचा दुसरा प्लॅन कंपनीकडून दिला जातो. वार्षिक प्लॅन संबंधित ग्राहकाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा पैसे घेऊन सुरू ठेवला जातो. आता ऍमेझॉनकडून तीन महिन्यांसाठीचा नवा प्लॅन देण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी ऍमेझॉन प्राईम हवे असेल तर सध्या ३८७ रुपये खर्च येतो. पण नव्या प्लॅनमध्ये यावर सूट देण्यात आली आहे. ग्रेट इंडियन सेलमध्ये तीन महिन्यांच्या प्राईम सदस्य नोंदणीसाठी ३२९ रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.  

ParikshapeCharcha 2020 : विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मोदींचा मोलाचा सल्ला

आता हा नवा तीन महिन्यांसाठीचा प्लॅन केवळ एकदाच देण्यात येणार आहे की संबंधित प्लॅन संपल्यानंतर ग्राहक पुन्हा त्याच रकमेला तो पुन्हा नव्याने वापरू शकतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. २२ जानेवारीपर्यंत हा सेल सुरू असेल.