पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनकडून सुवर्णसंधी, पैशांविना सुरु करा स्वतःचा व्यवसाय

अ‍ॅमेझॉन

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून कंपनीसाठी पॅकेजिंगचा व्यवसाय सुरु करण्याची ऑफर दिली आहे. प्राइम ग्राहकांना दोन ऐवजी एका दिवसात डिलेव्हरी देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कंपनीने ही नवी खेळी केली आहे. 

अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे की, नव्याने उद्योग सुरु करणाऱ्यांसाठी सुमारे सात लाख रुपयांची मदत दिली जाईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या वेतनचाही भार कंपनी सोसेल. ही संधी अर्धवेळ आणि पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही असेल. 

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमवर नियमावलीसाठी याचिका, सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून उत्तर मागवले

साहित्याच्या डिलेव्हरीसाठी डाक विभाग आणि इतर कुरिअरचा वापर कमी करण्यावर कंपनीचा भर आहे. आतापर्यंत २०० हून अधिक अ‍ॅमेझॉन डिलेव्हरी बिझनेस सुरुही झाल्याचे, कंपनीचे जागतिक पुरवठा विभागाचे उपाध्यक्ष जॉन फेल्टन यांनी सांगितले. 

- अ‍ॅमेझॉन करणार ७ लाख रुपयांची मदत
- कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांचे वेतन देणार

रोबोटही करणार सामानाचे पॅकिंग

अ‍ॅमेझॉन सामानाच्या पॅकिंगची जबाबदारी रोबोटही सांभाळणार आहेत. ऑर्डर पॅक करणारा एक रोबोट कार्टनरॅप २४ कर्मचाऱ्यांची जागा घेईन. यामुळे अमेरिकेतीलच ५५ गोदामातील १३०० नोकऱ्या संकटात येण्याची शक्यता आहे. कंपनी स्कॅनिंग-कोडिंग, गोदाम आणि घरापर्यंत डिलेव्हरीसाठी या पूर्वीपासूनच रोबोट, ड्रोनची मदत घेत आहे.