पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांनी घेतला ११७१ कोटींचा बंगला

जेफ बेझॉस

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांनी लॉस एंजेलिसमध्ये १६.५ कोटी डॉलरचा (११७१.५ कोटी रुपयांहून अधिक) अलिशान बंगला खरेदी केला आहे. लॉस एंजेलिसमध्ये महागडी संपत्ती खरेदीचा हा नवा विक्रम मानला जातो.

सबसिडीशिवाय घरगुती गॅससाठी मोजावी लागणार अधिक रक्कम!

अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नल च्या वृत्तानुसार बेजॉस यांनी हे आलिशान घर (वॉर्नर इस्टेट) माध्यम व्यावासायिक डेव्हिड गेफेन यांच्याकडून खरेदी केले आहे. लॉस एंजेलिसमध्ये निवासी संपत्ती खरेदी करण्याचा आतापर्यंतचा हा सर्वांत महागडा व्यवहार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये लाशन मर्डोक यांनी बेल-एअर इस्टेट खरेदी करण्यासाठी सुमारे १५ कोटी डॉलर खर्च केले होते. 

एक रुपयाच्या नव्या नोटेची ही वैशिष्ट्ये माहितीयेत का?

वॉर्नर इस्टेट नावाचा हा बंगला बेवर्ली हिल्समध्ये नऊ एकरांत उभारण्यात आला आहे. यामध्ये गेस्ट हाऊस, टेनिस कोर्ट आणि गोल्फ कोर्ससमवेत इतर अनेक गोष्टी आहेत. वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी हा बंगला १९३० मध्ये बांधला होता. 

साडेचार लाख भारतीयांचे क्रेडिट-डेबिट कार्ड धोक्यात

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांची ११० अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मानले जाते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amazon CEO Jeff Bezos set records 165 million mansion purchase Beverly Hills home in Los Angeles