पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुगल अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंना १७२० कोटींचे पॅकेज

सुंदर पिचाई

गुगलची मातृ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना १७२० कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. यामध्ये १७०६ कोटी रुपयांचे (२४० मिलियन डॉलर) शेअर्स आणि १४.२२ कोटी रुपये वार्षिक वेतनाचा समावेश आहे. पिचाई यांचे नवीन वेतन पॅकेज जानेवारी २०२० पासून लागू होईल. त्यांच्या वेतनात सुमारे २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्च इंजिन गुगलमध्ये आतापर्यंत कोणत्याही सीईओला दिलेले हे सर्वांत मोठे पॅकेज ठरले आहे. 

३१ डिसेंबरपूर्वी ही चार कामे नक्की संपवा, मगच नव्या वर्षाचे स्वागत करा...

पिचाई यांनी त्यांना देण्यात आलेले सर्व लक्ष्य पूर्ण केल्यास येत्या तीन वर्षांत ही रक्कम देण्यात येईल. जर एस अँड पी १०० इंडेक्समध्ये अल्फाबेटची कामगिरी चांगली राहिल्यास पिचाई यांना अतिरिक्त ६३९ कोटी रुपये (९० मिलियन डॉलर) मिळतील. मागील महिन्यातच म्हणजे गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई बिन यांनी आपले पद सोडले, त्यावेळीच पिचाई यांना यासाठी निवडण्यात आले होते. त्यांना गुगलची सहकंपनी अल्फोबेटचे सीईओ करण्याची घोषणा ही ४ डिसेंबर रोजी झाली होती. 

महिंद्रा समूहात मोठे बदल; आनंद महिंद्रा सोडणार कार्यकारी अध्यक्षपद

२०१६ मध्ये १४२२ कोटीः सुंदर पिचाई यांना यापूर्वीही अशाप्रकारचे मोठे पॅकेज मिळाले आहे. त्यांना २०१६ मध्येही १४२२ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) पॅकेज देण्यात आले होते. पिचाई यांनी २०१८ मध्येही अशाच प्रकारचे एक पॅकेज घेण्यास नकार दिला होता. पिचाई यांनी दीर्घ काळापासून गुगलमध्ये कर्मचारी म्हणून काम केलेले आहे. गुगलचे लोकप्रिय ब्राऊजर क्रोम आणि गुगल अँड्रॉएड टीमचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. पिचाई यांनी गुगलचे आणखी काही लोकप्रिय उत्पादन जी मेल आणि अँड्रॉएड ऑपरेटिंग सिस्टिमवरही काम केले आहे. ते २०१५ मध्ये गुगलचे सीईओ झाले होते. 

मारुती सुझुकीची नवी अल्टो लाँच, किंमत ३.८० लाख

मस्क आघाडीवर
सर्वांधिक वेतन-भत्ते मिळवण्यात टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे आघाडीवर आहेत. त्यांना वर्ष २०१८ मध्ये ३५९१ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते. ते फोर्ब्सच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या जागतिक यादीत ५३ व्या क्रमांकावर होते. 

व्हा सावध! मोबाइल चार्ज करतानाही बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे

मदुराईतील जन्म
सुंदरराजन पिचाई यांचा तामिळनाडूतील मदुराईमध्ये १२ जुलै १९७२ रोजी जन्म झाला होता. त्यांनी आयआयटी खडगपूरमधून बी टेक आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस केल्यानंतर अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.