पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशांतर्गत विमान वाहतुकीवरील बंदीत आणखी वाढ

खरेदीदार न मिळाल्यास ६ महिन्यात एअर इंडिया बंद होण्याची शक्यता

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने शुक्रवारी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी १४ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी हा लॉकडाऊन लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने बंदीमध्ये आणखी वाढ केली.

सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या २३वर, एका दिवसात १२ जण पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदीही आधीच १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती. आता देशांतर्गत विमान वाहतुकीवरील बंदीच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला महासंचालनालयाने ३१ मार्चपर्यंत देशांतर्गत विमान वाहतुकीवर बंदी घातली होती. 

मालवाहतुकीच्या विमानांवर ही बंदी असणार नाही. त्याचबरोबर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मंजूर केलेल्या विशेष उड्डाणांवरही बंदी असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांनंतर नरेंद्र मोदी म्हणाले...

एअर इंडियाने आपली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक याआधीच १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.