पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअरटेलचा भन्नाट प्लॅन, रिचार्जवर मिळणार २ लाखांचा जीवन विमा

एअरटेल कंपनीने भन्नाट प्लॅन मार्केटमध्ये आणला आहे.

दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या एअरटेलने भारती एक्सा लाइफ विमा कंपनीच्या साथीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्लॅन मार्केटमध्ये आणला आहे. १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह एअरटेल आपल्या ग्राहकांना २ लाखांचे जीवन विमा संरक्षण देणार आहे. रविवारी कंपनीने यासंदर्भातील घोषणा केली. 

 

'... जर अमित शहांनी मनात आणलं तर सीमावाद सहज मिटेल'

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एअरटेलचे नवे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. १७९ रुपयेच्या नव्या कनेक्शनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमेटेड कॉलिंग, २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस सह २ लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या पॅकची वैधता२८ दिवसांची असेल.  नव्या प्रीपेड बंडल प्लॅनसह १७९ रुपये इतक्या मासिक दराने विमा संरक्षण देण्याची योजनेसह एअरटेलने एक नवा मापदंडच बाजारामध्ये निर्माण केला आहे. हा पॅक निम शहरी, शहरी आणि ग्रामीण भागातील स्मार्टफोन युजर्संना डोळ्यासमोर ठेवून बाजारात आणला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या प्लॅनसह एअरटेलशी कनेक्टिंग होऊन रिचार्जसह ग्राहकाला आपल्या कुटुंबियांना अर्थिक संरक्षण देण सहज शक्य होईल, असा दावा कंपनीने केलाय.  

प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट, तासभर चर्चा

या प्लॅनचा १८ ते ५४ वर्षांच्या  ग्राहकांना लाभ घेता येईल, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सेठ यांनी दिली आहे. विशेष म्हणजे विमा संरक्षणसाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची किंवा वैद्यकीय तपासणीची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमुळे विमा क्षेत्रालाही एक प्रकारे चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही विकास सेठ यांनी व्यक्त केलाय.