पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअरटेलकडून ग्राहकांना झटका, बंद केली ही सेवा

एअरटेल

एअरटेलने आपल्या ग्राहकांना झटका देताना काही प्लॅन्सबरोबर दिले जात असलेले नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्लॅनबरोबरची ही सुविधा बंद करण्यात आली आहे. यामध्ये एअरटेल Xstream फायबर ब्रॉडबँड आणि काही पोस्टपेड प्लॅनचाही समावेश आहे. दरम्यान, व्होडाफोन आणि ACT फायबरनेटसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्या आजही ही सुविधा देत आहेत. रिलायन्स जियोने आपल्या अनेक प्लॅनबरोबर अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्ससारख्या अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यास सुरुवात केली होती. 

... म्हणून दिल्ली, मुंबईत ड्रोनने पिझ्झा डिलिव्हरी शक्य नाही

भारती एअरटेल आपल्या काही पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनबरोबर ३ महिन्यांचे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन ऑफर करत होती. आता कंपनीने यासंबंधी आपल्या वेबसाइटवर अपडेटही केले आहे. तेथून नेटफ्लिक्स हटवण्यात आले आहे. परंतु, विद्यमान युजर्सला ही सुविधा त्यांची व्हॅलिडिटी संपेपर्यंत जारी राहिल. 

LIC चे अंशतः खासगीकरण, पॉलिसीधारकांसाठी शाप की वरदान?

ही सुविधा सुरुच राहणार

एअरटेलच्या बहुतांश पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनबरोबर अॅमेझॉन प्राइम, Zee5 आणि Xstream सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. एअरटेलच्या ४९९च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. त्याचबरोबर एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, Zee5 आणि Xstream सारख्या अॅप्सच्या सब्सक्रिप्शनशिवाय हँडसेट प्रोटेक्शनही मिळते.

... म्हणून इन्कम टॅक्ससाठी अर्थमंत्र्यांनी आणली नवी पद्धत