पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्होडाफोन- आयडिया, एअरटेलची दरवाढ ३ डिसेंबरपासून लागू

एअरटेलची दरवाढ ३ डिसेंबरपासून लागू

व्होडाफोन- आयडिया, आणि एअरटेल यांच्या प्रिपेड मोबाइल सेवांच्या शुल्कात ३ डिसेंबरपासून वाढ होत आहे. या कंपन्यांनी शुल्कात ५०% पर्यंतची वाढ केली आहे. तर या कंपन्यांच्या पाठोपाठ रिलायन्स जिओनंही आपल्या शुल्कात ४० % पर्यंत वाढ केली असल्याचं  जाहीर केलं आहे. सर्वांत स्वस्तात ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या रिलायन्सची दरवाढ ही ६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. या मोठ्या कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार हे नक्की.

खबर!, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात ६ टक्क्यांची वाढ

एअरटेल आणि व्होडाफोन- आयडियानं सुरूवातीलाच नवे मोबाइल प्लान जाहीर केले. नव्या प्लाननुसार एअरटेलच्या प्रतिदिन शुल्कात ५० पैसे ते २.८५ पैशांची वाढ होणार आहे. शुल्क वाढले असले तरी ग्राहकांना  डेटा वापर आणि कॉलिंगचे भरपूर फायदे मिळणार असल्याचं कंपनीनं सांगतिलं आहे. 

पाच वर्षांत ११४ कंपन्या बंद, १६ हजार कर्मचाऱ्यांना फटका

व्होडाफोन- आयडियानंही आपल्या सेवा शुल्कात वाढ केली आहे. पूर्वीपेक्षा नवे प्लान हे ४२ % नी महागले आहेत. ३ डिसेंबरपासून नवे शुल्क लागू होणार आहेत. स्वस्तात  सेवा पुरवणाऱ्या रिलायन्सनं शुल्कात ४०% पर्यंत वाढ केली आहे. शुल्कात वाढ झाली असली तरी ग्राहकांना ३०० टक्के अधिक फायदा होणार आहे असंही रिलायन्स कंपनीनं म्हटलं आहे.