पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिचार्ज छोटा, फायदा मोठा; एअरटेलचा नवा प्लॅन

एअरटेलचा नवा प्लॅन

मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये सध्या तीव्र स्पर्धा आहे. रोज एका कंपनीकडून नवा प्लॅन बाजारात आणला जातो, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार ९७ रुपयांचे रिचार्ज केल्यावर ग्राहकाला अमर्यादित कॉल्सची आणि डेटाची सुविधा मिळणार आहे.

एअरटेलकडून याआधी १४८ रुपयांचा प्लॅन बाजारात आणण्यात आला होता. आता या नव्या प्लॅनच्या माध्यमातून कंपनी छोट्या किंमतीचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे ओढू इच्छिते. काही दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स आणि डेटा वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी नवा प्लॅन आणण्यात आला आहे, असे एअरटेलने स्पष्ट केले आहे. या प्लॅननुसार ग्राहकाला २ जीबी डेटा मिळणार असून, अमर्यादित कॉल्सची सुविधा आणि १०० एसएमएस करता येणार आहेत.

कंगना वादावर बालाजी टेलीफिल्म्सनं मागितली पत्रकारांची माफी

काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने सुद्धा अशा स्वरुपाचा प्लॅन बाजारात आणला होता. अमरनाथ यात्रेवर जाणाऱ्या भाविकांसाठी हा प्लॅन आणण्यात आला आहे. त्याची सेवा सात दिवसांसाठीच मर्यादित आहे. या प्लॅनसाठी ग्राहकांना १०२ रुपये मोजावे लागत आहेत. प्लॅनमध्ये ५०० एमबीचा डेटा देण्यात आला आहे.