पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जियोला टक्कर देण्यासाठी एअरटेल देत आहे २० जीबी 'फ्री' डेटा

एअरटेल

टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. विविध कंपन्या वेगवेगळ्या ग्राहकांना विचारत घेऊन रोज नवनव्या ऑफर सादर करत आहेत. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांनंतर टेलिकॉम कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी ऑफर आणत आहेत.

ओला, उबर झाले जुने, नव्या कंपन्यांच्या प्रवेशाने ग्राहकांचा फायदा! 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेल काही प्रीपेड प्लॅन्सबरोबर २० जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. परंतु, हा डेटा वेगवेगळ्या प्लॅन्सच्या हिशेबाने वेगवेगळा आहे. हे प्लॅन्स ५ जीबी, १० जीबी आणि २० जीबी पर्यंत आहे. यामध्ये सर्वांत लोकप्रिय प्लॅन हा ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये २० जीबी अतिरिक्त डेटा ग्राहकांना मिळत आहे. पण यामध्ये काही नियम आणि अटींचा समावेशही आहे.

EPFO ने बदलले PF काढण्याचे नियम

एअरटेल हा अतिरिक्त ४ जी डेटा मोबाइल अकाउंटमध्ये देणार नाही. जिथे एअरटेलने वायफाय झोन उपलब्ध केले आहे. तिथेच अतिरिक्त डेटाचा फायदा ग्राहकांना घेता येईल. एअरटेल वायफाय झोन्स मोफत वायफाय हॉटस्पॉट आहे. देशातील प्रमुख शहरातील ५०० ठिकाणी ते उपलब्ध आहे. ग्राहकांना २० जीबी मोफत डेटाचा फायदा त्याच जागेवर घेता येईल.

वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते?

या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकाला माय एअरटेल अ‍ॅपच्या माध्यमातून वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करावे लागेल. व्हेरिफिकेशननंतर मोफत इंटरनेट सेवेचा फायदा घेता येईल.