पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐकावे ते नवलंच! विमानातील बाथरुम, किचन गायब होण्याच्या मार्गावर...

विमानाच्या अंतर्गत भागातील छायाचित्र

आतापर्यंत हवाई प्रवास हा आरामदायी म्हणून ओळखला जात होता. पण नजीकच्या कालावधीत विमान प्रवास अधिक खडतर आणि शारीरिक क्षमता ताणणारा ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आशियामध्ये या क्षेत्रातील वाढते प्रवासी, सेवा पुरविणाऱ्या अपुऱ्या कंपन्या, स्पर्धा आणि वाढते नुकसान यातून मार्ग काढण्यासाठी आता नवनवीन बदल केले जात आहेत. त्यातच आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या प्रवासाला मध्यमवर्गीय प्रवासी जास्त प्राधान्य देत असल्याने कंपन्यांनी आरामदायी प्रवासापेक्षा परवडणाऱ्या प्रवासाला महत्त्व देण्याचे ठरविले आहे.

अवघ्या २६ व्या वर्षी पाकच्या मोहम्मद अमिरची कसोटीतून निवृत्ती

फिलिपाईन्समध्ये सर्वात मोठ्या सेबू एअर कंपनीकडून विमानाच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कंपनीच्या ताफ्यातील काही विमानांमधील स्वयंपाक विभाग (किचन) आणि स्वच्छतागृहे (बाथरूम) काढून टाकण्यात येणार आहे. नव्या एअरबस ए ३३० विमानांमध्ये प्रवाशांसाठी अधिकाधिक जागा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विमानात प्रवाशांसाठी ४६० आसने तयार होतील. सध्याच्या आसनसंख्येपेक्षा हा आकडा २० ने जास्त आहे, असे कंपनीने सांगितले. अधिक मागणी असलेल्या मार्गावर जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

या क्षेत्रातील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आशियामध्ये प्रत्येकवर्षी १० कोटी प्रवासी पहिल्यांदाच विमान प्रवास करतात. यामध्ये मध्यमवर्गीयांचे प्रमाण वाढते आहे. मध्यमवर्गीय प्रवासी हे विमान प्रवास किती आरामदायी आहे, या पेक्षा तो आर्थिकदृष्ट्या किती परवडणारा आहे, याचा जास्त विचार करतात. त्यानुसारच विमान कंपन्यांना नियोजन करावे लागणार आहे.

आशियातील विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात सगळ्याच गोष्टी कमी पडू लागल्याचे दिसते आहे. यामध्ये वैमानिक, विमानतळावरी तंत्रज्ञ, धावपट्ट्या याचा समावेश होतो.

मुंबई विमानतळावर 'ध' चा 'मा', 'बॉम्बे' म्हटल्याचे ऐकले 'बॉम्ब है'

काही विमान कंपन्यांनी यावर मार्ग म्हणून मोठ्या आकाराची विमाने खरेदी करण्याचे ठरविले आहे. एअर एशिया ग्रुपने हाच निर्णय घेतला आहे. जूनमध्ये कंपनीकडून नव्या विमानांसाठी देण्यात आलेल्या ऑर्डरमध्ये बदल करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. ५० प्रवासी अधिक बसू शकतील आणि आधीच्या तुलनेत १००० किलोमीटरपर्यंत जास्त वेळ उडू शकतील, अशी विमाने कंपनीकडून मागविण्यात आली आहेत.