पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवरात्रीच्या काळात प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सुविधा

एअर इंडिया

नवरात्रीच्या काळात जास्तीत जास्त प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाने भोजनाचा खास मेन्यू तयार केला आहे. प्रवाशांना प्रवासावेळी नेहमीच्या भोजनासोबतच हा नवा पर्यायही या काळात उपलब्ध असणार आहे. नवरात्रीच्या काळात देशात अनेक लोक उपवास करतात. त्यामुळे खास त्यांच्यासाठी उपवासाचे विविध पदार्थ विमानात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. देशांतर्गत प्रवासावेळी हा मेन्यू उपलब्ध असणार आहे.

राज्य बँकेत एका पैशाचाही भ्रष्टाचार नाहीः अजित पवार

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या प्रवाशांना उपाशी राहायला लागू नये. म्हणूनच आम्ही हा नवा मेन्यू प्रवाशांना उपलब्ध करून देणार आहोत. 

'मारुती'च्या निवडक गाड्या स्वस्त, पाहा किंमती किती कमी झाल्या

नवरात्रीच्या काळात कशा पद्धतीचे पदार्थ विमानामध्ये दिले जावेत. ते पदार्थ तयार करताना कोणते घटक पदार्थ वापरावेत, याच्या सविस्तर सूचना एअर इंडिया व्यवस्थापनाकडून भोजन तयार करणाऱ्या विभागाला देण्यात आल्या आहेत. उपवासाच्या पदार्थांमध्ये विविध फळे, ड्रायफ्रूट खीर, दही, बटाट्याचे चिप्स, बटाट्याचे फ्राईज एअर इंडियाच्या विमानात उपलब्ध असणार आहेत.