पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअर इंडिया कर्मचारी संघटनेचा भत्ता कपातीला विरोध, दिला मोदींच्या भाषणाचा दाखला

एअर इंडियाने कर्मचाऱ्यांचा भत्ता कपातीचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीमुळे अनेक कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड पडण्याचे संकेत गडद होत आहेत. देशातील विमान सेवेतील एअर इंडिया कंपनीने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यामध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र एअर इंडिया पायलट कर्मचारी संघटनांनी या कपातीला विरोध दर्शवला आहे.  

जनधन योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपये जमा

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा केल्यापासून दोनवेळा देशवासियांशी संवाद साधला. या दोन्ही वेळेला मोदींनी प्रामुख्याने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कंपन्यांनी वेतन कपात किंवा कामगार कपात करु नये, असा उल्लेख केला होता. एअर इंडिया पायलट संघटनेने मोदींच्या भाषणातील संदर्भ देत भत्ता कपातीला विरोध दर्शवला आहे.  

कोरोनामुळे या सात शहरांतील घरांच्या विक्रीत होणार घसरण

एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्यामध्ये कपात करण्याचा घेतलेला निर्णय हा केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या विरोधातील आहे, असे इंडियन पायलट गिल्ड( आयपीजी) आणि इंडियन कमर्शियल पालयट असोसिएशनने म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एअर इंडियाचे प्रमुख राजीव बन्सल यांना पत्र लिहिले आहे. 

लॉकडाऊन असूनही मार्चमध्ये ९७,५९७ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

कोरोना विषाणूचे वेगाने होणाऱ्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ मार्चपासून १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीत लॉकडाऊनचा निर्णय लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यामध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कंपनी आपला निर्णय बदलणार का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल.