पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खरेदीदार न मिळाल्यास ६ महिन्यात एअर इंडिया बंद होणार ?

खरेदीदार न मिळाल्यास ६ महिन्यात एअर इंडिया बंद होण्याची शक्यता

आर्थिक संकटाचा सामना करत असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला जर खरेदीदार मिळाला नाही तर पुढील वर्षीच्या जूनपर्यंत ती बंद करावी लागण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तुकड्या-तुकड्याने मिळालेल्या मदतीवर जास्त काळापर्यंत गाडी चालवली जाऊ शकत नाही, असेही या अधिकाऱ्याने म्हटले. 

एअर इंडियाच्या भविष्याबाबत वाढत चाललेल्या अनिश्चिततेदरम्यान या अधिकाऱ्याने म्हटले की, १२ छोटे विमाने  उड्डाणाअभावी उभे आहेत. त्यांना पुन्हा चालू करण्यासाठी निधीची गरज आहे. विमान कंपनीवर सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकार निर्गुंतवणकीच्या पद्धतीवर काम करत आहे. 

पॅन-आधारशी लिंक करण्यासाठी आणखी मुदत वाढ

या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, जर पुढील वर्षीच्या जून पर्यंत कोणी संभाव्य खरेदीदार नाही मिळाला तर एअर इंडिया पण जेट एअरवेजप्रमाणे रस्त्यावर येऊ शकते. खासगीकरणाच्या योजनांदरम्यान सरकारने कर्जाखाली दबल्या गेलेल्या कंपनीत आणखी गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एअर इंडियाला कोणत्याही पद्धतीच्या मदतीची तरतूद करुन काम करावे लागत आहे. अशा पद्धतीने दीर्घ काळापर्यंत ही कंपनी चालणे मुश्किल आहे. 

नव्या वर्षातील दहा नवे नियम अन् त्याचे परिणाम

आम्ही मोठ्या मुश्किलीने या परिस्थितीत कसे तरी काम करत आहोत. अशा स्थितीत आम्ही जूनपर्यंत काम करु शकतो. जर कोणी खरेदीदार मिळू शकला नाही तर आम्हाला दुकान बंद करावे लागेल. आम्ही कंपनी सुरु राहावी म्हणून सरकारकडे २४०० कोटी रुपयांची सरकारी गॅरंटी मागितली होती. परंतु, सरकारने फक्त ५०० कोटी रुपयाचीच सरकारी गॅरंटी दिली.

सोने खरेदीसाठी चाललात, तर हे जरुर वाचा

सरकार चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एअर इंडियामधील आपल्या हिस्स्याची विक्री करण्यासाठी रुची पत्र जारी करु शकते. खरेदीदार मिळाल्यास याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात. पण यासाठी पुढील महिन्यात विक्री प्रक्रिया सुरु व्हायला हवी. परंतु, आर्थिक स्थिती पाहता सरकारला गुंतवणूकदार मिळण्याची शक्यता कमी आहे.

'भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था, फ्रान्स-ब्रिटनला टाकले मागे'