पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खासगीकरणाच्या निर्णयानंतर एअर इंडियातील वैमानिकांची गळती, ६५ जणांचे राजीनामे

एअर इंडियाचे खासगीकरण

एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ६५ वैमानिकांनी राजीनामा देऊन इतर विमान कंपन्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ६५ वैमानिकांनी गतवर्षात एअर इंडियाला रामराम ठोकला.

निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने सर्वात आधी जून २०१७ मध्ये घेतला होता. पण त्यानंतर मे २०१८ मध्ये सरकारने आपला निर्णय लांबणीवर टाकला. एअर इंडियाला विकत घेण्यास कोणीही फारशी उत्सुकता न दाखविल्याने सरकारने निर्णय लांबणीवर टाकला. त्यामुळे २०१७ आणि २०१८ या वर्षांमध्ये एअर इंडियातून फारसे वैमानिक बाहेर पडले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

एअर इंडियातील एका वरिष्ठ वैमानिकाने सांगितले की, २०१८ मध्ये एअर इंडियाच्या खासगीकरणावरून अनिश्चितता होती. त्यामुळे त्या वर्षात केवळ एकाच वैमानिकाने राजीनामा दिला होता. पण त्यानंतर २०१९ मध्ये सरकारने खासगीकरणासाठी पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू केली. पुन्हा एकदा इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यामुळे गेल्या वर्षात वैमानिकांनी राजीनामा देऊन बाहेर पडण्यास सुरुवात केली.

'देश के गद्दारों को' घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

ज्या वैमानिकांनी गेल्यावर्षी राजीनामा दिला आहे. त्यापैकी सर्वाधिक हे दिल्लीस्थित होते. ६५ वैमानिकांपैकी ३५ जण दिल्लीतील तर १६ जण मुंबईतील होते. उर्वरित वैमानिक बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमधील होते, असेही एअर इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.