पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरुच

शेअर बाजार (ANI)

मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरल्याचे दिसत आहे. शुक्रवारी घसरणीसह बंद झालेला शेअर बाजारातील निरुत्साह सोमवारीही दिसला. सकाळी ११.३० पर्यंत सेन्सेक्स ६२१.६० अंकानी कोसळत ३८,८९१.७९ वर आला तर निफ्टी १९१.१० अंकानी घसरुन ११,६२०.०५ वर आला. शुक्रवारपासून आतापर्यंत सेन्सेक्स १०९८.६१ अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीत ३४४.७० अंकाची घसरण झाली. 

दरम्यान, शेअर बाजाराला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिला अर्थसंकल्प पंसत पडल्याचे दिसत नाही. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडून शेअर मार्केटला भरपूर अपेक्षा होत्या. यामुळेच अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक तासआधी सेन्सेक्स वधारून ४०,००० अंकांवर पोहोचला होता. पण अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला.