पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पानंतर रेल्वे प्रवाशांना बसू शकतो धक्का, दरवाढ होण्याची शक्यता

अर्थसंकल्पानंतर रेल्वे प्रवाशांना बसू शकतो धक्का, दरवाढ होण्याची शक्यता

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर रेल्वे भाड्यात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी रेल्वे स्थानक विकास, सुपरफास्ट-सर्व्हिस सरचार्ज लावून प्रवाशांचा खिसा रिकामा केला जाईल. त्याचबरोबर उपनगरी रेल्वे सेवेच्या (लोकल) भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. मर्यादित उत्पन्न आणि अनियंत्रित खर्चामुळे आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी सरकारकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. 

विकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज

रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ जानेवारीला मेल-एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी, दुरांतोसह लांब पल्ल्याच्या ३५० रेल्वेच्या सर्व श्रेणींचे भाडे वाढवण्यात आलेले आहे. यामुळे रेल्वेला वार्षिक २३०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. परंतु, प्रवाशांमध्ये वार्षिक तोटा ५५ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन आदींवर ६७ टक्के पैसे खर्च होत आहे. यामुळे रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो ९८.४४ टक्केपर्यंत गेला आहे. म्हणजेच १०० रुपये कमावण्यासाठी रेल्वेला ९८.४४ रुपये खर्च होत आहे. 

अर्थसंकल्पापूर्वीच लागू होतील हे बदल

मेल-एक्स्प्रेस रेल्वेंना सुपरफास्ट घोषित करुन अप्रत्यक्षरित्या भाडे वाढवले जाऊ शकते. त्याचबरोबर रेल्वे स्थानक विकास सरचार्ज पहिल्यांदा लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर आरक्षण शूल्क आणि सेवा शुल्कात वाढ केली जाऊ शकते. लोकलच्या दरातही ३ ते ५ पैसे प्रति किमी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, सरकार मोठा विचार करुन या दिशेने पुढे जात आहे. कारण, नियमित प्रवाशांची नाराजी रेल्वेसमोर समस्या निर्माण करु शकते. देशात प्रतिदिन २ कोटी ४० लाख रेल्वे प्रवाशांमध्ये लांब पल्ल्याचे प्रवासी १४ ते १५ लाख आहेत. उर्वरित नियमित प्रवासी आहेत. 

विप्रोच्या सीईओंचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पायउतार

रेल्वे मंडळाचे अधिकारी प्रवासी दरात पुन्हा वाढ करण्यासाठी वातावरण निर्मिती करत आहेत. यासाठी अधिकारी अनेक पद्धतीने प्रचार करत आहेत. अधिकाऱ्यांकडून लेख लिहिले जात आहेत. त्यामुळे भाडे वाढ केल्यास जनतेतून तीव्र प्रतिक्रिया येऊ नये असा प्रयत्न केला जात आहे. 

दि. १ जानेवारीपासून लांब पल्ल्याच्या सर्व श्रेणीच्या मूळ भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सर्व श्रेणीत चार पैसे प्रती किमी आणि स्लीपर श्रेणीत दोन पैसे प्रती किमी दराने भाड्यात वाढ केली होती. त्यावेळी भाडेवाढीवर लोकांनी कोणतीच प्रतिकूल प्रतिक्रिया दिली नव्हती.