पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अदानी समूहाला मिळाली कोळसा, गॅस आणि महामार्गांची कामे

उद्योगपती गौतम अदानी

उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाला महामार्ग निर्मिती, विमानतळ विकास, कोळसा खाण आणि शहरी गॅस वितरणाशी निगडीत विविध प्रकल्पांची कामे मिळाली आहेत. कंपनी मागील काही वर्षांपासून अशाप्रकारच्या कामांच्या निविदेत सहभाग होत आहे. 

कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या काही काळापासून आक्रमक पद्धतीने बोली लावत लॅाजिस्टिक, खाणकाम, ऊर्जा, निर्मिती आणि कृषी उत्पादनांच्या क्षेत्रातील कामे मिळवली आहेत.

फेब्रुवारीत अदानी इंटरप्रायजेसने देशातील सुमारे अर्धा डजन विमानतळांच्या विकासकामांच्या बोलीप्रक्रियेत सहभाग नोंदवला होती. कंपनीने या विमानतळांसाठी भारतीय विमान प्राधिकरणला पुढील ५० वर्षांसाठी प्रति प्रवासी सर्वाधिक शूल्क देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला कोळसा खाण विकास आणि दळण-वळणाची कामे मिळाली असून त्यांची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ६.४ कोटी टनांहून अधिक आहे. अदानी ग्रीन एनर्जीने मागील पाच वर्षांत २,६२३ मेगावॅट सौर ऊर्जा आणि १,५४७ मेगावॅट पवन ऊर्जा योजनेची निविदा भरली होती.

अदानी गॅसला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये १३ शहरात पाइपद्वारे स्वंयपाकाच्या गॅसचा पुरवठा करणे आणि सीएनजीची किरकोळ विक्री करण्याचे काम मिळाले आहे.

सध्या अदानी गॅसकडून उत्तर प्रदेशमधील खुर्जा, हरयाणातील फरिदाबाद आणि गुजरातमधील वडोदरा आणि अहमदाबाद येथे गॅसचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर अदानी ट्रान्सपोर्टने मागील वर्षी एप्रिलमध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा येतील रस्ते विकास प्रकल्पाची कामे मिळवली आहेत.