पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधार कार्डवरील ही माहिती अपडेट करण्यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही

आधार कार्ड

जर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचा फोटो बदलायचा असेल आणि नवा फोटो हवा असेल, तर यापुढे कोणत्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही. यासोबतच आधार कार्डवरील बायोमेट्रिक माहिती, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी बदलण्यासाठीही यापुढे कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. फक्त आधार नोंदणी सेवा केंद्रात जाऊन तुम्ही ही माहिती बदलू शकतात. यावेळी तुमचे आधारकार्ड तुमच्यासोबत असणे अनिवार्य आहे.

'गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात जाईन'

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने एक नोटीस जारी केली असून, त्यामध्ये या स्वरुपाच्या माहितीत बदल करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नसल्याचे म्हटले आहे. ज्या नागरिकांना आधारकार्डमधील आपला फोटो, बायोमेट्रिक माहिती, मोबाईल नंबर, ई-मेल याची माहिती बदलायची असेल, त्यांना केवळ आधार सेवा केंद्रात जावे लागेल. तिथे जाताना कोणतेही कागदपत्र बाळगण्याची गरज नाही. केवळ आधार कार्ड बरोबर घेऊन नागरिक जवळच्या आधार केंद्रात जाऊ शकतात आणि माहितीत बदल करू शकतात.

फारुख अब्दुल्ला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्ध

आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलायची असेल, तर त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची यादीही आधार संदर्भातील वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर आधारच्या ट्विटर हँडलवरूनही ही माहिती शेअर करण्यात आली आहे.