पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता पॅनऐवजी आधारही चालेल, पण चुकीला मोजावे लागतील १० हजार

करदात्याला पॅन कार्ड ऐवजी आधार कार्ड वापरता येणार आहे.

आयकर विभागाने करदात्याला पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डवरील १२ क्रमांकाचा बायोमेट्रिक आयडी देण्याची संमती दिली आहे. मात्र चुकीचा आधार क्रमांक दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही तरतूद करण्यात आली आहे. जर आधार क्रमांक चुकीचा असेल तर १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.  

नीता अंबानी झाल्या जगातील सर्वांत मोठ्या कला संग्रहालयाच्या ट्रस्टी

आयकर अधिनियमन १९६१ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बदललेल्या नियमावलीनुसार, पॅन क्रमांकाच्या ऐवजी आधार क्रमांकाचा वापर करणे शक्य होणार आहे. मात्र चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दंड वसूल करण्याचा नियम करण्यात आला आहे.  पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करणाऱ्याला दंडात्मक कारवाईचा नियम लागू असेल. उल्लेखनिय आहे की, इनकम टॅक्स रिटर्न फायलिंग, बँक अकाउंट, डी मॅट अकाउंट आणि ५० हजारपेक्षा अधिक म्यूचुअल फंड तसेच बाँड खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य होते. मात्र नव्या नियमानुसार आता या व्यवहारामध्ये आधार कार्डचा वापर शक्य होईल.  

व्होडाफोनकडून निर्वाणीचा इशारा; CEOने सरकारकडे मागितली मदत

आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी करण्यात येते. मात्र दंड आकारणी ही आयकर विभागाकडून करण्यात येईल. आयकर अधिनियमन १९६१ के सेक्शन २७२ बी नुसार पॅन संदर्भातील अफरातफर प्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. आयकर विभाग याप्रकरणी १० हजार रुपये दंड आकारणी केली जाऊ शकते.  

आधार कार्डसंबंधित नियम आणि दंडात्मक तरतूद 

१. पॅन कार्ड ऐवजी चुकीचा आधार क्रमांक दिल्यानंतर दंडात्मक कारवाई होऊ शकते.  
२. कोणत्याही व्यवहारात पॅन कार्ड आणि आधार कार्ड दिले नाही तर दंड आकारण्यात येऊ शकतो.   
३. केवळ आधार कार्ड देऊन चालणार नाही तर आधार बायोमेट्रिक प्रमाणित असणे आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते.    
४. नव्या नियमानुसार पॅन आणि आधार प्रमाणित न करणाऱ्या वित्तीय संस्थाकडूनही दंड आकारणी केली जाऊ शकते.   
५. जर तुम्ही दोन फॉर्ममध्ये चुका केल्या तर दंडाची रक्कम १० हजार ऐवजी २० हजार होईल. त्यामुळे पॅन ऐवजी आधारचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.