पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिमुकल्या हातांनी साकारली शुभेच्छा पत्रे

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिमुकल्या हातांनी साकारली शुभेच्छा पत्रे

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संत गोरोबाकाकांच्या या भक्तीच्या मळ्यात साहित्याचा सुगंध पसरणार असल्यामुळे हे साहित्य संमेलन उस्मानाबादकरांसाठी मोठी आनंदाची पर्वणी निर्माण करणारे ठरणार आहे. त्यातच शालेय  विद्यार्थ्यांनी देखील हे साहित्य संमेलन हे माझं साहित्य संमेलन आहे आणि पहिल्यांदाच हे संमेलन माझ्या जिल्ह्यात होतं आहे, याचाच अभिमान बाळगून हे संमेलन मोठ्या उंचीवर पोचविण्यासाठी त्यांनी देखील कंबर कसली आहे.

प्रणिती शिंदेंना डावलले, काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा राजीनामा

उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने आपण सगळेचजण बाजारातील शुभेच्छा पत्र आणून एकमेकांना शुभेच्छा देतो. मात्र याच शुभेच्छा जर स्वतःच्या हातांनी लिहलेल्या असतील तर तो आनंद गगनात मावणारा नसतो. कळंब तालुक्यातील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील इयत्ता सहावी व सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आगळीवेगळी संकल्पना राबवत येणार्‍या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या शुभेच्छा पत्रावर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिकांच्या कवितेच्या ओळी हस्तलिखित केल्याने ही शुभेच्छापत्रे मोठ्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. एकीकडे बाजारात इंग्रजी, हिंदी व मराठी शुभेच्छा पत्रांचा वर्षाव होत असताना देखील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही आगळीवेगळी विद्यार्थ्यांनी बनविलेली शुभेच्छापत्रे साहित्य संमेलनातील साहित्यिकांना देण्यात येणार आहेत. या उपक्रमसाठी सहशिक्षक रमेश अंबिरकर यांनी मार्गदर्शन केले आहे. दोन वर्षांपूर्वी नाट्य संमेलन झाल्यानंतर सगळ्यानांच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी आपल्याकडे होणार याची उत्कंठा लागली होती. अखेर हे साहित्य संमेलन दि. १०, ११ व १२ जानेवारीला होणार असल्याने हे संमेलन आगळंवेगळं करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

ठाकरेंविरोधात वादग्रस्त पोस्ट, बीडमध्ये महिला शिवसैनिकाकडून शाईफेक

शुभेच्छा पत्रावर संदेश
या शाळेतील तब्ब्ल १०० चिमुकल्या हातांनी बनवलेल्या या शुभेच्छा पत्रावर संत गोरोबा काका यांचे अभंग, कवी कुसुमाग्रज, सुरेश भट, ग. दि. माडगूळकर,  विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे आदी साहित्यिकांच्या मराठी भाषेच्या गौरव करणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत. तसेच ९३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह देखील चिटकवण्यात आले आहे. 

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा

घरगुती साहित्यातून आकर्षक सजावट 
श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेत दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने अशी मराठीतून शुभेच्छा पत्र तयार केली जातात. मात्र यावर्षी शुभेच्छापत्र ही विद्यार्थ्यांना विशेष आनंद देणारी ठरली आहेत. रंग पेटीतील रंग, टाकाऊ कागदांचे तुकडे, लोकर, टिकल्या, लेस अशा टाकाऊ साहित्यापासून ही सुरेख शुभेच्छापत्रे विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत.