पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतातील ६३ अब्जाधीशांकडे देशाच्या बजेटपेक्षा अधिक संपत्ती

भारतातील ६३ अब्जाधीशांकडे देशाच्या बजेटपेक्षा अधिक संपत्ती

भारतात ६३ अब्जाधीशांकडे २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातील रक्कम २४,४२,२०० कोटींहून अधिक संपत्ती आहे. ऑक्सफेमच्या अहवालानुसार सोमवारी हा खुलासा झाला. या एक टक्के श्रीमंतांकडे ७० टक्के गरीब लोकसंख्येच्या (९५.३ कोटी) तुलनेत चारपट अधिक पैसा आहे. मानवाधिकाराचा पुरस्कार करणारी संघटना ऑक्सफेमने जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीपूर्वी 'टाइम टू केअर'चा अहवाल जारी केला. 

डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव होणार, कोर्टाचे आदेश

या अहवालानुसार आर्थिक असमानता वेगाने वाढत आहे. मागील दशकात (२०१०-१९) अब्जाधीशांची संख्या दुप्पट झाली आहे. जगातील १ टक्के श्रीमंतांकडे संयुक्तरित्या ९२ टक्के गरीबांची एकूण संपत्ती दुप्पट आहे. तर २१५३ अब्जाधीशांकजे जगातील ६० टक्के गरीब लोकसंख्येच्या संपत्तीपेक्षा जास्त धन आहे. 

पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०१९ साठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर अंदाज कमी करुन ४.८ केला आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक असमानता
१०६ रुपये प्रती सेकंद सरासरी कमाई करतात आयटी कंपनीचे सीईओ

१० मिनिटात एका घरगुती कामगाराच्या वार्षिक उत्पन्नाहून अधिक कमावतात सीईओ

झोमॅटोच्या प्लेटमध्ये उबर इट्स, २५०० कोटी रुपयांना खरेदी