पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार

5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार

दूरसंचार उपकरणे बनवणारी प्रमुख कंपनी नोकियाला भारती एअरटेलने 5जी नेटवर्क तयार करण्यासाठी ७५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. त्या अंतर्गत कंपनी देशातील ९ दूरसंचार सर्कलमध्ये नेटवर्क तयार करेल. भारती एअरटेलने ही माहिती दिली. या कराराअंतर्गत नोकिया 4जी सेवांसाठी तीन लाख बेस स्टेशन तयार करेल. जी पुढच्या पिढीच्या सेवांसाठी स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर 5जी नेटवर्कमध्ये अपग्रेड केली जाईल. 

भारती एअरटेलने नेटवर्क क्षमता आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी हा करार केला आहे. एअरटेलने या ९ दूरसंचार सर्कलमध्ये नोकियाच्या सिंगल रेडिओ एक्सेस नेटवर्क (एसआरएएन) तंत्रज्ञानासाठी काही वर्षांचा समझोता करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कराराचे मूल्य सुमारे ७५०० कोटी रुपये आहे. 

पोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री

एअरटेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या अंतर्गत एअरटेलकडून या ९ सर्कलमध्ये सुमारे ३ लाख रेडिओ नेटवर्क उपकरण लावले जातील. हा या वर्षीचा पहिला नेटवर्क विस्तार करार असेल. विशेष म्हणजे लॉकडाऊनदरम्यान वेगवान डाटाच्या मागणीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. 

भारती एअरटेलने म्हटले की, आम्ही ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी अनेक नव्या तंत्रज्ञानाची सातत्याने गुंतवणूक करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. नोकियाबरोबरचे हे पाऊल याच दिशेनने एक मोठे पाऊल आहे. 

देशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग

या देशांमध्ये सुरु झाली आहे 5जी सेवा

अमेरिकेतील काही ठिकाणी ही सेवा सुरु झाली आहे. त्याचबरोबर काही यूरोपीयन देशांचाही यात समावेश आहे. यामध्ये स्वित्झर्लंड, फिनलँड आणि ब्रिटनचा समावेश आहे. त्याचबरोबर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, स्पेन, स्वीडन, कतार आणि यूएईमध्येही 5जी सेवा सुरु करण्याची अधिकृत घोषणा झालेली आहे. 

चारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन

4जी पेक्षा 5जी किती फरक

5जी तंत्रज्ञान हे 4जी तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असेल. हे सर्व काही दूरसंचार कंपनीच्या गुंतवणूक आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून असते. सध्या 4जी वर सर्वाधिक ४५ एमबीपीएसचा वेग शक्य आहे आणि एक चिप उत्पादक कंपनीच्या मते 5जी तंत्रज्ञान यापेक्षा १० ते २० टक्के अधिक वेग देऊ शकेल.