जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपयांची रक्कम ३ एप्रिलपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. बँक आपल्या खातेधारकांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना देत आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या जनधन खातेधारकांना एसएमएस पाठवून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्हाला तुमची चिंता आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेअंतर्गत पीएमजेडीवायच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ महिन्यांसाठी ५०० रुपये दरमहा जमा होणार आहेत. तुम्हाला पैसे काढण्याची तारीख आणि वेळ कळवली जाईल. तुम्हाला विनंती आहे की, तुम्हाला दिलेली तारीख आणि वेळेनुसार बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्रांशी संपर्क करा. सावध राहा, स्वस्थ रहा-धन्यवाद.
धारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन
कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान मोदी सरकारने महिलांना दिलासा देण्याची घोषणा केली होती. सरकारने लॉकडाऊनदरम्यान गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी जनधन खातेधारक महिलांना पुढील ३ महिन्यांपर्यंत ५०० रुपये दरमहा देण्याचा निर्णय घेतला होता. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
अमेरिकेत २४ तासांत ११६९ जणांचा मृत्यू
३ एप्रिल ते ९ एप्रिलदरम्यान खात्यात जमा होणार रक्कम
एप्रिल महिन्यासाठी ही रक्कम ३ एप्रिल ते ९ एप्रिलदरम्यान खात्यात जमा होईल. इंडियन बँक असोसिएशनने निवेदन जारी करुन म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बँकांसाठी सूची बनवण्यात आली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी पैशांचे वितरण होईल. अकाऊंट नंबरच्या अखेरच्या संख्येच्या आधारावर पैसे खात्यात जमा केले जातील.
कोरोना विषाणू ट्रॅकर अॅप 'आरोग्य सेतू' डाऊनलोड करा आणि सुरक्षित राहा
केव्हा काढू शकता पैसे
- ज्या खातेधारकांच्या अकाऊंट नंबरची संख्या ० किंवा १ असेल. ते ३ एप्रिलला पैसे काढू शकतात.
- ज्यांच्या अकाऊंट नंबरच्या अखेरीस २ किंवा ३ संख्या असेल. ते ४ तारखेला पैसे काढू शकतील.
- ज्यांच्या अकाऊंट नंबरच्या अखेरीस ४ किंवा ५ संख्या असेल त्यांच्या खात्यात ७ एप्रिलला पैसै जमा होतील.
- ज्यांच्या अकाऊंट नंबरच्या अखेरीस ६ किंवा ७ संख्या असेल त्यांच्या खात्यात ८ एप्रिल आणि ९ एप्रिलला पैसे जमा होतील.
- ९ एप्रिलनंतर लाभार्थी कोणत्याही दिवशी पैसे काढू शकतील.
लाभार्थ्यांनी ही रक्कम काढण्यासाठी जवळच्या एटीएम किंवा का RuPay कार्ड, बँक मित्र, सीएसपीचा उपयोग करावा. यामुळे बँक शाखांमध्ये जास्त गर्दी होणार नाही.