पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा आधीच्या सरकारांमुळेच शक्य - प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी

केंद्रातील आधीच्या सरकारांनी केलेल्या ठोस कामांमुळेच २०२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेल्या विविध प्रयत्नांमुळेच आज देशातील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात चांगले काम होऊ शकते आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा

समृद्ध भारत फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका व्याख्यानामध्ये प्रणव मुखर्जी यांनी देशासंदर्भात विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ते म्हणाले, २०२४ पर्यंत भारत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असे अर्थ मंत्रालय सांगत असले. तरी त्यामागे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत विविध सरकारनी घेतलेले ठोस निर्णय आणि केलेले प्रयत्न हेच प्रमुख कारण आहे. हे प्रयत्न ब्रिटिशांच्या काळात नाही तर स्वातंत्र्यानंतरच घेण्यात आले.

देशाच्या विकासात बिगर काँग्रेसी सरकारांनीही महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचे सांगून प्रणव मुखर्जी म्हणाले, मंगलयान एक दिवसात जादूने तयार झाले नाही. त्यासाठी अनेक वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले आणि त्याचा पाया रचण्यात आला. ब्रिटिशांनी त्याच्या कार्यकाळात भारतीयांची पिळवणूक केली. या सगळ्यातून तावून सुलाखून भारतीय लोक पुढे आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सपा-बसपाला धक्का बसण्याची शक्यता, आणखी खासदार भाजपच्या वाटेवर

यावेळी त्यांनी ब्रिटिशांच्या काळातील अन्यायाची आणि स्वातंत्र्यानंतरच्या विकासाची अनेक उदाहरणेही दिली.