पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१ डिसेंबरपासून हे ५ नियम बदलले; ज्याचा थेट परिणाम खिशावर होणार

हे ५ नियम बदलणार

१ डिसेंबरपासून काही नियम आणि काही गोष्टी बदलल्या आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होणार आहे. काही गोष्टींमध्ये आपल्यावर भार वाढेल. मोबाईल कॉल रेटपासून ते आपल्या विमा पॉलिसी महाग झाल्या आहेत. एटीएममधून पैसे काढणे हे देखील आपला खिसा रिकामा करु शकतात. काय आहेत या ५ गोष्टी ते जाणून घेऊया…

१. मोबाईल बिल अधिक द्यावे लागेल
देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांचे रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कॉल दर एक डिसेंबरपासून महाग होणार आहे. हे दर किती वाढतील याचा कंपन्यांनी खुलासा केलेला नाही. कंपन्यांचे म्हणणे आहे की, नुकसान आणि उद्योग टिकवून ठेवण्यासाठी दर वाढविणे आवश्यक झाले आहे.

२. विमा पॉलिसी महाग होईल
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) च्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे आपल्या जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम १५% पर्यंत महाग होऊ शकतो. नवीन नियमांचा परिणाम १ डिसेंबर २०१९ पूर्वी विकल्या गेलेल्या पॉलिसीवर होणार नाही. पॉलिसी मध्येच बंद होण्याच्या ५ वर्षाच्या आत त्याचे नूतनीकरण करु शकतो. सध्या त्याचा अवधी दोन वर्ष केला आहे.

३. जास्त पैसे काढण्याचे नियम
येत्या १ डिसेंबरपासून आयडीबीआय बँकेच्या एटीएम संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. जर या बँकेचा ग्राहक दुसर्‍या बँकेच्या एटीएममध्ये व्यवहार करतो आणि कमी रक्कम शिल्लक राहिल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाला. तर, त्याला प्रति व्यवहारासाठी २० रुपये द्यावे लागतील.

४. एनईएफटी २४ तास सक्षम असेल
१ डिसेंबरपासून बँक ग्राहक २४ तास एनईएफटी करू शकतील. सध्या, एनईएफटी सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत करता येते. जानेवारीपासून यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

५. इथेनॉलच्या किंमतीत वाढ
सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने १.६४ रुपयांनी वाढवलेली इथेनॉलची किंमत १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. सी-ग्रेड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत १९  पैशांनी वाढून ४३.७५ रुपये प्रति लीटर आणि बी-ग्रेड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत १.८४ रुपये वाढून ५४.२७ रुपये प्रति लिटर होणार आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: 5 government rules change from 1 december which will have a direct impact on your pocket