पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल

4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल

मुकेश अंबानींची रिलायन्स जियो कंपनी 4 जी डाउनलोड स्पीडमध्ये सलग २१ व्या महिन्यात अव्वल आहे. भारतीय दूरसंचार नियामक संस्थेने (ट्राय) यासंबंधी सप्टेंबरमधील प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत जियोने इतर प्रमुख कंपन्यांना मागे टाकले आहे. सप्टेंबरमध्ये जियोचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड २१ एमबीपीएस होता. 

ट्रायच्या नवीन आकडेवारीनुसार, सप्टेंबरदरम्यान भारती एअरटेलच्या कामगिरीत किरकोळ सुधारणा दिसून आली आहे. एअरटेलचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड ऑगस्टमध्ये ८.२ एमबीपीएस होती. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ८.३ एमबीपीएस अशी किरकोळ वाढ दिसून आली. ऑगस्टमध्ये कंपनीचा स्पीड जुलैच्या ८.८ एमबीपीएसवरुन घटून ८.२ एमबीपीएसपर्यंत खाली आला होता.

BSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी

रिलायन्स जियोच्या सरासरी 4 जी स्पीडपेक्षा एअरटेलचा स्पीड अडीच पट कमी आहे. व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलरने एकत्रीकरण केले आहे. आता ते व्होडाफोन आयडिया असे काम करत आहेत. तरीही ट्रायने दोघांची आकडेवारी वेगवेगळी दर्शवली आहे.

व्होडाफोन नेटवर्कचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या ७.७ एमबीपीएसवरुन ६.९ एमबीपीएसपर्यंत आला. आयडियाच्या स्पीडमध्ये किरकोळ सुधारणा नोंदवण्यात आली. आयडियाचा 4 जी स्पीड ६.४ एमबीपीएस राहिला. 

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार

सरासरी 4 जी अपलोड स्पीडमध्ये आयडिया पुन्हा एकदा ५.४ एमबीपीएस स्पीडसह अव्वलस्थानी आहे. व्होडाफोन आणि एअरटेलचा सप्टेंबरमधील सरासरी अपलोड स्पीड सप्टेंबरमध्ये क्रमशः ५.२ आणि ३.१ एमबीपीएस राहिला. सप्टेंबरमध्ये व्होडाफोनचा ४ जी अपलोड स्पीड कमी झाला. तर एअरटेलचा वेग स्थिर होता. याप्रकरणात रिलायन्स जियोचा स्पीड ४.२ एमबीपीएस इतका होता.