पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घाबरू नका, Income Tax च्या नव्या पर्यायातही ५० वजावटी उपलब्ध

प्राप्तिकर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांसाठी नव्या पद्धतीने प्राप्तिकर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. यामध्ये प्राप्तिकरदात्यांना प्राप्तिकराच्या कर दरात सवलत देण्यात आली आहे. या नव्या पर्यायावरून देशातील नोकरदारांमध्ये सध्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आता या नव्या पर्यायातही एकूण ५० प्रकारच्या प्रमाणित वजावटी प्राप्तिकरदात्यांना वापरता येतील, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या पर्यायानुसार एकूण उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही तर सरकारने आखून दिलेल्या प्रमाणित वजावटी वापरल्यानंतर उर्वरित उत्पन्नावर कर द्यावा लागेल. 

बांगलादेशींनो चालते व्हा नाहीतर...; मनसेचा पोस्टरबाजीतून इशारा

नव्या पर्यायातील प्रमाणित वजावटींमध्ये भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणूक, स्वेच्छा निवृत्तीतून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषत्वाने नोकरदारांनी निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासंदर्भात केलेली गुंतवणूक या पर्यायामध्ये प्रमाणित वजावट म्हणून वापरता येईल. पण सुटीसह प्रवास भत्ता (एलटीए), घरभाडे भत्ता (एचआरए), गृहकर्जावरील व्याज यांचा या पद्धतीमध्ये प्रमाणित वजावट म्हणून वापर करता येणार नाही. याचा वापर करायचा असेल तर करदात्यांना जुन्या पर्यायानुसार जास्त कर दराने प्राप्तिकर द्यावा लागेल.

या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोदचंद्र मूडी 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना म्हणाले, नव्या पर्यायामध्ये त्याच प्रमाणित वजावटी ठेवण्यात आल्या आहेत ज्या संबंधित प्राप्तिकरदात्याच्या निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी केलेल्या गुंतवणुकीच्या आहेत. ज्यांना इतर ठिकाणी केलेली गुंतवणूकही प्राप्तिकरात दाखवायची आहे. त्यांच्यासाठी जुन्या कर दराने प्राप्तिकर भरण्याची सुविधाही ठेवण्यात आली आहे.  

वैयक्तिक करदात्याच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. किती खर्च करायचा आणि किती बचत करायची याचा निर्णय तो स्मार्टपणे घेऊ शकतो, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. करदात्यांच्या हातात जास्तीत जास्त रक्कम राहावी, यासाठीच नव्या पद्धतीने कमी दरात प्राप्तिकर भरण्याचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

चीनमध्ये कोरोनाने घेतला आणखी ६४ जणांचा बळी; मृतांचा आकडा ४२५

प्राप्तिकर भरण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध करून दिल्याने करदात्यांच्या हातात एकूण ४० हजार कोटी रुपये राहणार आहेत, असेही निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले होते. 

प्रमाणित वजावटी म्हणजे काय?
इंग्रजीतील स्टॅंडर्ड डिडक्शनला मराठीत प्रमाणित वजावटी म्हणतात. वैयक्तिक करदात्यांना आर्थिक वर्षात मिळणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तिकर द्यावा लागतो. पण हा प्राप्तिकर देण्यापूर्वी वैयक्तिक करदात्याने विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक त्याला एकूण वार्षिक उत्पन्नातून वजा करण्याची संधी मिळते. प्राप्तिकर विभागाने कोणत्या ठिकाणी केलेली गुंतवणूक यासाठी ग्राह्य धरली जाईल, याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्याच ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीला प्रमाणित वजावट म्हणतात. प्राप्तिकर देण्यापूर्वी करदात्याच्या वार्षिक उत्पन्नातून प्रमाणित वजावट वजा केली जाते. त्यानंतर जे उत्पन्न राहते. त्यावरच आवश्यकतेनुसार त्याला प्राप्तिकर भरावा लागतो.