पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबादमधील Amazon च्या नव्या भल्या मोठ्या ऑफिसात ४९ लिफ्ट्स, झुम्बा क्लासेस; तरीही...

ऍमेझॉनचे हैदराबादमधील नवे ऑफिस

क्षणाक्षणाला वरखाली करणाऱ्या एक, दोन नव्हे तर तब्बल ४९ लिफ्ट्स, आपल्या १५ हजार कर्मचाऱ्यांना कायम फिट ठेवण्यासाठी झुम्बा क्लासेसची ऑफिसच्या आवारातच केलेली सोय... ही काही निवडक वैशिष्ट्ये आहेत हैदराबादमधील ऍमेझॉनच्या नव्या भल्या मोठ्या ऑफिसमधील. ऍमेझॉनचे जागतिक पातळीवरील हे सर्वात मोठे ऑफिस असणार आहे. यातूनच ऍमेझॉनच्या व्यवस्थापनाला भारतीय बाजाराकडून किती अपेक्षा आहेत हे दिसून येते.

'कुली नंबर १' च्या सेटला आग, सुदैवानं जीवितहानी नाही

२०१३ मध्ये ऍमेझॉनने पहिल्यांदा भारतात आपली शाखा सुरू केली. त्यावेळी कंपनीचे मुख्य लक्ष्य १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली भारताची ऑनलाईन बाजारपेठ काबीज करण्याचे होते. पण कंपनीला आता वॉलमार्टची गुंतवणूक असलेल्या फ्लिपकार्टशी जोरदार टक्कर द्यावी लागते आहे. ऍमेझॉनच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालक दीप्ती वर्मा म्हणाल्या, ऍमेझॉनसाठी भारतीय बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची आहे. 

भारतातील भल्या मोठ्या बाजारपेठेत यश मिळवणे वाटते तितके सोपे नाही. त्यातच भारतात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांना फायद्यापेक्षा तोट्यालाच सामोरे जावे लागते आहे. कंपनीचा विस्तार नव्या बाजारांचा शोध यामुळे कंपनीची गुंतवणूकही वाढतीच आहे. त्यातच भारताचा विचार केल्यास ऍमेझॉनला लवकरच रिलायन्स समूहाकडूनही कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह लवकरच ऑनलाईन बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट

एकीकडे हे सगळे घडत असतानाच दुसरीकडे ई-कॉमर्स क्षेत्रातील मक्तेदारीविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचाही फटका ऍमेझॉनला बसणार आहेच. ज्या उत्पादनांमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीची गुंतवणूक आहे. ते उत्पादन या कंपन्या आपल्या साईटवरून विकू शकणार नाहीत, असे निर्बंध सरकारने घातले आहेत. त्याचबरोबर एखाद्या उत्पादनाची विक्री केवळ एकाच ई-कॉमर्स साईटवरूनही करता येणार नाही, असेही नियम सरकारने लागू केले आहेत. त्याचाही या क्षेत्रातील कंपन्यांना विचार करावा लागणार आहे.