पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच वर्षांत ११४ कंपन्या बंद, १६ हजार कर्मचाऱ्यांना फटका

कर्मचारी

वर्ष २०१४ पासून आतापर्यंत देशात एकूण ११४ कंपन्या किंवा त्यांच्या शाखा (युनिट्स) बंद झाल्या आहेत. बंद झालेल्या कंपन्यांमधून काम करणारे सुमारे १६ हजार लोक यामुळे प्रभावित झाले आहेत. केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

लोकसभा सदस्य दानिश अली यांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला होता. मागील पाच वर्षांत देशातील किती कंपन्या बंद झाल्या आणि यामुळे किती लोक बेरोजगार झाले आहेत? त्याचबरोबर यामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने काय व्यवस्था केली, असा सवाल दानिश अली यांनी केला होता. श्रम मंत्रालयाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये एकूण ३४ कंपन्या बंद झाल्या. यामधील ३३ कंपन्या या राज्य क्षेत्रातील होती आणि एक केंद्राशी संबंधित होती. कंपन्या बंद झाल्यानंतर ४७२६ लोक प्रभावित झाले.

१ डिसेंबरपासून हे ५ नियम बदलले; ज्याचा थेट परिणाम खिशावर होणार

तर २०१५ मध्ये एकूण २२ कंपन्या बंद झाल्या. यामध्ये २० राज्य क्षेत्र आणि दोन केंद्र सरकारशी निगडीत होत्या. कंपन्या बंद झाल्यामुळे १८५२ लोक प्रभावित झाले. २०१६ मध्ये २७ युनिट्स बंद झाले आणि यामुळे प्रभावित झालेल्यांची संख्या ६०३७ झाली. २०१७ मध्ये २२ कंपन्या बंद झाल्या आणि २७४० लोक प्रभावित झाले. २०१८ मध्ये ८ कंपन्या बंद झाल्यामुळे ५३७ लोक प्रभावित झाले. वर्ष २०१९ साठी सरकारकडून जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतची माहिती दिली. या कालावधीत राज्य क्षेत्रात एक कंपनी बंद झाली आहे. याचा फटका ४५ लोकांना फटका बसला आहे. त्याचबरोबर २०१४ नंतरची सर्व आकडेवारी ही तात्पुरती असल्याचेही सांगण्यात आले. म्हणजेच येणाऱ्या वर्षांत या आकडेवारीत वाढही दिसू शकते.

GDP आकडे हैराण करणारे, मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली चिंता

काय आहे कारण
- आर्थिक चणचण, कच्च्या मालाची कमतरता, मागणीत घट, कामगारांची समस्या, खाणीचा परवाना निलंबन आणि कोळसा ब्लॉक वाटप रद्द होण्यामुळे या कंपन्या बंद झाल्याचे कारण सरकारकडून देण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन-प्रशिक्षण
- सरकारने सांगितले की, प्रभावित कर्मचाऱ्यांच्या हितांची काळजी घेण्यात आली आहे. औद्योगिक वाद अधिनियम-१९४७ अंतर्गत त्यांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना छोट्या कालावधीचे कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जात आहे. याचा लाभ घेत स्वयंरोजगार किंवा नवीन नोकरी मिळवता येईल.

सोन्याचे दागिने खरेदीबाबत सरकारचा मोठा निर्णय, ग्राहकांवर होणार परिणाम