Share Market News : भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू असून आठवड्याचा पहिला दिवसही त्यास काल अपवाद नव्हता. निफ्टी १७८ अंकांनी घसरून २३,३८१ वर, बीएसई सेन्सेक्स ५४८ अंकांनी वधारून ७७,३११ वर, तर बँक निफ्टी निर्देशांक १७७ अंकांनी घसरून ४९,९८१ वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप सेगमेंटमधील घसरण चिंता वाढवणारी ठरली. या पार्श्वभूमीवर आज इंट्राडे खरेदीसाठी तज्ञांनी काही स्वस्त शेअर्स सुचवले आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले, 'निफ्टी ५० निर्देशांकाचा मूळ कल नकारात्मक आहे. २३,४०० अंकांच्या महत्त्वपूर्ण आधाराच्या खाली गेल्यानंतर अल्पावधीत बाजार २३,२०० किंवा त्यापेक्षा कमी होईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. आज निफ्टीला तात्काळ प्रतिकार २३,५०० च्या पातळीवर ठेवण्यात आला आहे.
‘बँक निफ्टी जोपर्यंत ४९,६५० च्या सपोर्ट लेव्हलच्या वर आहे, तोपर्यंत बँक निफ्टीसाठी बाय-ऑन-डिप्स स्ट्रॅटेजी राबवावी. तर, अप्पर साइडला ५०,६०० च्या पातळीवर अल्पावधीत बँक निफ्टीला मोठा प्रतिकार होईल,’ असं 'असित सी. मेहता'चे एव्हीपी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह रिसर्च ऋषिकेश येडवे म्हणाले.
आजच्या इंट्राडे शेअर्सबाबत एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजमधील संशोधन एव्हीपी महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी मदरसन सुमी वायरिंग इंडिया, एनबीसीसी (इंडिया), जम्मू-काश्मीर बँक आणि बीएल कश्यप अँड सन्स हे चार शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
सुगंधा सचदेवा यांचा आजचा इंट्राडे स्टॉक
हा शेअर ५३.९० रुपयांवर खरेदी करा, लक्ष्य ५५.५० रुपये आणि स्टॉप लॉस ५२.९० रुपये ठेवा.
महेश एम ओझा यांचा इंट्राडे शेअर
हा शेअर ८९ ते ९०.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ९२.५० रुपये, ९४ रुपये, ९६ रुपये, ९८ रुपये आणि १०० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ८६ रुपयांवर ठेवा.
हा शेअर ९६ ते ९७.२५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ९८.५० रुपये, १०० रुपये आणि १०२ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ९४ रुपयांपेक्षा कमी ठेवा.
अंशुल जैन यांचा सल्ला
हा शेअर ६१.५० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ६५ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ६० रुपये (क्लोजिंग बेसिस) ठेवा.
संबंधित बातम्या