Share Market : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) वित्तीय व्यवस्थेत दीड लाख कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ची घसरण थांबली आणि हे निर्देशांक वधारून स्थिरावले. या पार्श्वभूमीवर आज इंट्राडे खरेदीसाठी तज्ञांनी १०० रुपयांपेक्षा स्वस्त पाच शेअर सुचवले आहेत.
असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमेडिएट्स लिमिटेडचे एव्हीपी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हरिसर्च हृषिकेश येडवे म्हणाले,
'बँक निफ्टी निर्देशांक घसरणीसह उघडला, खरेदीचा जोर पाहिला आणि दिवसअखेर सकारात्मकरित्या ४८,८६७ वर स्थिरावला. जोपर्यंत निर्देशांक ४७,८४० आहे, तोपर्यंत तेजीचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे. तर ४९,२०० आणि ४९,५०० रेझिस्टन्स पॉईंट म्हणून काम करतील. त्यामुळं ट्रेडर्सनी बँक निफ्टीमध्ये खरेदी-विक्रीचं धोरण अवलंबावं असा सल्ला देण्यात आला आहे.
सध्याच्या परिस्थितीत शेअर बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी - रिसर्च महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी सुझलॉन एनर्जी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि स्टील सिटी सिक्युरिटीज लिमिटेड या ५ समभागांची खरेदी किंवा विक्री करण्याची शिफारस केली.
> सुगंधा सचदेवा यांची शिफारस
सुझलॉन एनर्जी : खरेदी ५० रुपये, टार्गेट ५५ रुपये, स्टॉपलॉस ४७ रुपये
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : खरेदी ४९.५० रुपये, टार्गेट ५१.८० रुपये, स्टॉपलॉस ४८ रुपये
> अंशुल जैन यांची शिफारस
स्टील सिटी सिक्युरिटीज लिमिटेड : खरेदी ९५ रुपये, टार्गेट १०० रुपये आणि स्टॉपलॉस ९३ रुपये
> महेश एम ओझा यांचे डे ट्रेडिंग स्टॉक
हा शेअर ९९ ते १०० रुपये दराने खरेदी करा, लक्ष्य १०२, १०५, १०८ आणि स्टॉपलॉस ९७ रुपये ठेवा
खरेदी ६४.५० ते ६५.५० रुपयांना करा. लक्ष्य ६७.५०-६९-७२+ रुपये आणि स्टॉपलॉस ६२.५० रुपये ठेवा.
संबंधित बातम्या