Share Market News : चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगरिया यांनी आजसाठी दोन शेअर निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन शेअर्स सुचवले आहेत. यामध्ये वंडर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, आयटीसीएलडी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
सुमित बागरिया यांचे शेअर्स
वंडर इलेक्ट्रिकल्स हा शेअर १७६.५९ रुपयांना खरेदी करा. या शेअरमध्ये आणखी तेजीचे संकेत आहेत.
हा शेअर १६२२.१ रुपयांना खरेदी करावा. स्टॉपलॉस १५५५ रुपये आणि टार्गेट १७१७ रुपये ठेवा.
खरेदी का करावा?: पर्ल ग्लोबल सध्या १६२२.१ च्या पातळीवर आहे. दैनंदिन चार्टवर या शेअरमध्ये जोरदार तेजीचे संकेत आहेत. १५५५ रुपयांच्या पातळीवर जोरदार सपोर्ट आहे. शिवाय, हा शेअर सर्व महत्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.
गणेश डोंगरे यांची शिफारस
टाटा कम्युनिकेशन्स १,६७५ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस १,६४० रुपये आणि टार्गेट प्राइस १,७३० रुपये ठेवा.
खरेदी का करावा?: शेअरच्या नुकत्याच झालेल्या शॉर्ट टर्म ट्रेंड अॅनालिसिसमध्ये तेजीचा रिव्हर्स पॅटर्न समोर आला आहे. या तांत्रिक पॅटर्नमुळं शेअरच्या किमतीत तात्पुरता फेरबदल होण्याची शक्यता आहे. या बदलामुळं हा शेअर १७३० च्या आसपास पोहोचू शकतो.
आयटीसी ४३६ रुपयांना खरेदी करून टार्गेट ४५० रुपये ठेवा. स्टॉपलॉस ४२५ रुपयांवर लावा.
खरेदी का करावा? या शेअरमध्ये पुन्हा ४३६ रुपयांच्या किमतीच्या पातळीवर रिव्हर्स प्राइस अॅक्शन फॉर्मेशन दिसून आलं असून, ४५० रुपयांच्या पुढील रेझिस्टन्स लेव्हलपर्यंत ही तेजी कायम राहू शकते.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर बाय रेटिंग असून टार्गेट प्राइस ३१० रुपये आहे. त्यासाठी २९२ रुपये स्टॉपलॉस ठेवा.
शेअरच्या नुकत्याच झालेल्या शॉर्ट टर्म ट्रेंड अॅनालिसिसमध्ये तेजीचा रिव्हर्स पॅटर्न समोर आला आहे. या तांत्रिक पॅटर्नवरून शेअरच्या किमतीत तात्पुरती फेरबदल होऊ शकतो, असं सूचित होतं. नजीकच्या भविष्यात हा शेअर पुन्हा ३१० च्या पातळीवर जाऊ शकतो.
संबंधित बातम्या