Stocks to Buy : १०० रुपयांपेक्षा स्वस्त स्टॉक्स खरेदी करायचे असतील तर आज हे ५ शेअर्स खरेदी करा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to Buy : १०० रुपयांपेक्षा स्वस्त स्टॉक्स खरेदी करायचे असतील तर आज हे ५ शेअर्स खरेदी करा!

Stocks to Buy : १०० रुपयांपेक्षा स्वस्त स्टॉक्स खरेदी करायचे असतील तर आज हे ५ शेअर्स खरेदी करा!

Feb 04, 2025 09:33 AM IST

Intraday Stocks To Buy : शेअर बाजार तज्ञांनी आज १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ५ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कोणते आहेत हे शेअर्स?

Stocks to Buy : १०० रुपयांपेक्षा स्वस्त स्टॉक्स खरेदी करायचे असतील तर आज हे ५ शेअर्स खरेदी करा!
Stocks to Buy : १०० रुपयांपेक्षा स्वस्त स्टॉक्स खरेदी करायचे असतील तर आज हे ५ शेअर्स खरेदी करा!

Share Market News : केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिका सरकारच्या बदललेल्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात बरेच चढउतार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इंट्राडे व्यवहारासाठी आज १०० रुपयांपेक्षा कमी शेअर्स खरेदी करायचे असतील तर बाजार तज्ञांनी ५ शेअर्सची शिफारस केली आहे. 

एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हॅन्ससेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी रिसर्च महेश एम ओझा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे सहाय्यक उपाध्यक्ष आणि रिसर्च हेड अंशुल जैन यांनी आपापले स्टॉक्स सुचवले आहेत. त्यात आयओबी, मदरसन सुमी वायरिंग इंडिया, सतिया इंडस्ट्रीज, क्यूपिड आणि स्पेन्सर रिटेल या कंपन्यांचा समावेश आहे.

सुगंधा सचदेवा यांची शिफारस

आयओबी 

आयओबी हा शेअर ४८.२० रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ५०.४० रुपये आणि स्टॉपलॉस ४६.८० रुपयांवर ठेवा.

मदरसन सुमी वायरिंग इंडिया

मदरसन सुमी वायरिंग इंडियाला ५५.८० रुपयांत खरेदी करून टार्गेट ५८.५० रुपये ठेवा, स्टॉपलॉस ५४ रुपये लावा.

महेश एम. ओझाचे शेअर्स

क्युपिड

हा शेअर ७३ ते ७५ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट प्राइस ७८ रुपये, ८० रुपये, ८३ रुपये आणि ८५ रुपये असेल. स्टॉपलॉस ७० रुपयांच्या खाली ठेवा.

स्पेन्सर्स रिटेल

स्पेन्सर्स रिटेल ८५ ते ८६ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट ८९ रुपये, ९२ रुपये, ९५ रुपये आणि १०० रुपये आणि स्टॉपलॉस ८२ रुपयांपेक्षा कमी ठेवा.

अंशुल जैन यांचा इंट्राडे स्टॉक

सतिया इंडस्ट्रीज

सतिया इंडस्ट्रीज ८९ रुपयांना खरेदी करा. उद्दिष्ट ९३ रुपये आणि स्टॉपलॉस ८७ रुपये (क्लोजिंग बेसिस) आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner