Stocks to buy today : अमेरिकन शेअर बाजारात मंगळवारी झालेली घसरण आणि सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीमध्ये झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत इंट्रा डेसाठी स्ट्रॅटेजी आखणाऱ्यांना शेअर बाजार तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे स्टॉक्स सुचवले आहेत.
‘आनंद राठी’च्या टेक्निकल रिसर्च विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया आणि बोनान्झा पोर्टफोलिओचे टेक्निकल अॅनालिस्ट विराट जगत यांनी ट्रेडर्सना काही सल्ले दिले आहेत. तसंच, त्यांनी सहा स्टॉकची शिफारस देखील केली आहे.
सुमीत बगाडिया यांनी वेस्टलाइफ फूडवर्ल्ड लिमिटेड ८६७.९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या शेअरची टार्गेट प्राइस ९०१ अशी निश्चित करतानाच बागडिया यांनी ८५४ रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
तसंच, पिडीलाइट इंडस्ट्रीजवर डाव लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. हा शेअर ७९५.५५ रुपयांवर खरेदी करून २,८४३ ही लक्ष्य किंमत ठेवावी. मात्र २,७६६ चा स्टॉप लॉस ठेवण्यास विसरू नये असंही त्यांनी बजावलं आहे.
गणेश डोंगरे यांनी सुचवलेल्या इंट्राडे स्टॉक्समध्ये टाटा स्टील व एशियन पेंट्सचा समावेश आहे. टाटा स्टील १३२ रुपयांच्या स्टॉपलॉससह १४३ चं टार्गेट ठेवून १३७.५० रुपयांवर खरेदी करता येऊ शकतो. एशियन पेंट्सबद्दलही त्यांनी विश्वास दाखवला आहे. हा शेअर ३,२९५ रुपयांमध्ये खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. किमान ३२४० रुपयांच्या स्टॉप लॉससह ३४०० चं टार्गेट ठेवून यात पैसे लावता येतील.
विराट जगत यांनी आयडीबीआय बँक आणि जेएम फायनान्शियल लिमिटेडची शिफारस केली आहे. आयडीबीआय बँक २१९५ ते २२०० च्या रेंजमध्ये खरेदी करता येईल. रुपये २१४१ चा स्टॉप लॉस लावून २,२७० रुपयांची टार्गेट प्राइस ठेवता येईल. जेएम फायनान्शियल लिमिटेडचा शेअर ११२ रुपयांचं टार्गेट ठेवून १०७ ते १०८ रुपयांवर खरेदी करता येईल. स्टॉप लॉस १०५ रुपयांवर लावावा.
(डिस्क्लेमर : वरील लेखातील मते तज्ज्ञांची स्वत:ची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या