stocks to buy : एका महिन्यात १८ टक्क्यांपर्यंत कमाई करून देऊ शकतात हे शेअर, तज्ज्ञांनी सांगितली नावं
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy : एका महिन्यात १८ टक्क्यांपर्यंत कमाई करून देऊ शकतात हे शेअर, तज्ज्ञांनी सांगितली नावं

stocks to buy : एका महिन्यात १८ टक्क्यांपर्यंत कमाई करून देऊ शकतात हे शेअर, तज्ज्ञांनी सांगितली नावं

Jul 22, 2024 01:15 PM IST

stocks to buy : भारतीय शेअर बाजार सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहे. मात्र, उद्याच्या अर्थसंकल्पासह जागतिक पातळीवरील घडामोडींमुळं काही चढउताराची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणते शेअर कमाई करून देऊ शकतात पाहूया…

stocks to buy : एका महिन्यात १८ टक्क्यांपर्यंत कमाई करून देऊ शकतात हे शेअर, एक्सपर्ट्सचा खरेदीचा सल्ला
stocks to buy : एका महिन्यात १८ टक्क्यांपर्यंत कमाई करून देऊ शकतात हे शेअर, एक्सपर्ट्सचा खरेदीचा सल्ला

Stocks to Buy : भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० मध्ये गेल्या आठवड्यात ०.१२ टक्क्यांची वाढ झाली असून सलग सातव्या आठवड्यात ही तेजी कायम आहे. यंदाच्या वर्षात निफ्टी १३ टक्क्यांनी वधारला आहे. 

मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी येणारा काळ चांगला आहे. मात्र, बाजारातील सध्याची तेजी आणि प्रॉफिट बुकिंगची लगबग यामुळं अल्पावधीत अस्थिरता येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि फेडच्या व्याजदरात कपात याविषयीची अनिश्चितता देखील बाजाराला चालना देऊ शकते.

उद्या, २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे. हा अर्थसंकल्प विकासाभिमुख आणि काही लोकप्रिय घोषणांसह आर्थिक शिस्तीचाही असेल, असं बोललं जात आहे. या अर्थसंकल्पावरून बाजाराची दिशा निश्चित होईल. गुंतवणूकदारांना उद्योगाभिमुख आणि लोकाभिमुख घोषणांची अपेक्षा आहे. ती पूर्ण झाल्यास बाजारात अधिक स्थैर्य येईल,' असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितलं.

अशा वेळी गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सावध राहून दर्जेदार शेअर्सवर सट्टा लावावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अल्पावधीसाठी तांत्रिक निर्देशांकांवर मजबूत दिसणारे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. अनेक तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे पुढील तीन-चार आठवड्यांत १० ते १८ टक्क्यांनी वाढू शकणारे नऊ शेअर्स इथं देत आहोत.

आनंद राठी शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स इक्विटी रिसर्चचे जिगर एस. पटेल यांची शिफारस

टायटन

हा शेअर सध्या ३२६३.०५ रुपयांवर ट्रेड करत आहे. तो ३५७५ रुपयांवर जाऊ शकतो. ३२३५ ते ३२६५ च्या दरम्यान खरेदी करता येईल. ३०९० हा स्टॉप लॉस लावावा.

बजाज फिनसर्व्ह

बजाज फिनसर्व्हचा शेअर सध्या १६३९ च्या आसपास ट्रेड करतोय. त्यात १० टक्के वाढीची अपेक्षा आहे. याचा अर्थ तो १८०० रुपयांवर जाऊ शकतो. १५५० चा स्टॉपलॉस लावून हा शेअर खरेदी करता येईल.

एथर इंडस्ट्रीज

हा शेअर सध्या ८९१ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. त्यात १० टक्के वाढीची अपेक्षा असून तो ९७० रुपयांवर जाऊ शकतो. ८६० ते ८८० च्या दरम्यान खरेदी करता येईल.

'प्रभुदास लिलाधर'चे तांत्रिक संशोधन विश्लेषक शिजू कुथुपलक्कल यांची शिफारस

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स

हा शेअर सध्या १२०२ रुपयांच्या पातळीवर आहे. हा शेअर १३४० पर्यंत जाऊ शकतो. त्यात १३ टक्के वाढीची अपेक्षा आहे. स्टॉपलॉस १११० रुपयांचा लावून खरेदी करता येईल.

आयटीडी सिमेंटेशन इंडिया

हा शेअर सध्या ४९९ रुपयांवर आहे. त्यात १३ टक्के वाढीची अपेक्षा असून तो ५८० पर्यंत झेप घेऊ शकतो. ५०५ ते ५१६ च्या दरम्यान खरेदीची संधी आहे.

सेंच्युरी टेक्सटाइल्स अँड इंडस्ट्रीज

या शेअरचा भाव सध्या २२१७ च्या आसपास आहे. यात १८ टक्के वाढीची अपेक्षा असून तो २५७० वर जाऊ शकतो. २१७० ते २२२० च्या दरम्यान खरेदी करता येऊ शकतो.

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजची शिफारस

क्विक हील टेक्नॉलॉजीज

हा शेअर ६२७.३५ च्या आसपास आहे. ६०० ते ५८८ च्या दरम्यान खरेदीची चांगली संधी आहे. या शेअरमध्ये १६ टक्के वाढीची अपेक्षा असून तो ६९० ते ७१५ पर्यंत जाऊ शकतो.

कोलगेट पामोलिव्ह (इंडिया)

हा शेअर सध्या ३१४४ च्या आसपास ट्रेड करतोय. त्यात १० टक्के वाढीची अपेक्षा आहे. तो ३४३५ पर्यंत जाऊ शकतो. ३०८० ते ३०२० च्या दरम्यान खरेदी करता येईल. 

नितीन स्पिनर्स 

नितीन स्पिनर्स या छोट्या कंपनीचा सध्या ४१३ रुपयांच्या जवळपास ट्रेड करतोय. तो ४३५ ते ४४८ वर जाऊ शकतो. त्यात १६ टक्के वाढीची अपेक्षा आहे. ३५३ रुपयांचा स्टॉप लॉस लावून खरेदी करण्याची संधी आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखातील तज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. ही केवळ शेअर्सच्या कामगिरीची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner